आधी पाठविलेल्या मुंबईत विजांच्या कडकडाटासह बरसणार पाऊस या बातमीसाठी जाेड
मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र कमाल तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात येत आहे. हवामान खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांशी तुलना करता, यंदा कमाल तापमानात मोठी घट नोंदविण्यात येत आहे. रविवारी तर कमाल तापमान २७.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. तत्पूर्वी शनिवारी कमाल तापमान २८ अंशाच्या घरात नोंदविण्यात आले होते. रविवारी यात १ अंशाची घसरण झाली. कमाल तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे मुंबईत गारवा निर्माण झाल्याचे चित्र आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चालू हंगामात आतापर्यंत नोंदविलेल्या कमाल तापमानापैकी रविवारी सर्वात कमी म्हणजे २७.४ अंश एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. या हंगामातील आतापर्यंतचे हे नीचांकी कमाल तापमान असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.