Join us  

मध्य आशियाई उड्डाण मार्ग, महाराष्ट्रातील ६ पाणथळ प्रदेशातून ११२ जलपक्षी प्रजातींची नोंद

By सचिन लुंगसे | Published: November 12, 2022 2:09 PM

ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान मध्य आशियाई उड्डाण मार्गाचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील सहा पाणथळ प्रदेशांमध्ये पक्षी सर्वेक्षण करण्यात आले होते.

मुंबई : ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान मध्य आशियाई उड्डाण मार्गाचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील सहा पाणथळ प्रदेशांमध्ये पक्षी सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये १८ पाणपक्षी कुटूंबातील एकूण ११२ पाणपक्षी प्रजातींची नोंद केली गेली, ज्याने राज्यातील मोठ्या पाणथळ प्रदेशांचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

मध्य आशियाई उड्डाण मार्गाद्वारे प्रवास करणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांसाठी, महाराष्ट्रात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या पाणथळ जागा आहेत. पक्षी त्यांच्या वार्षिक चक्रादरम्यान प्रजनन, विश्रांतीचे ठिकाण आणि हिवाळ्याचे ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी उड्डाण मार्ग वापरतात. Convention on Migratory Species (CMS) ने जगभरात नऊ स्थलांतरित उड्डाण मार्ग दर्शविले आहेत. त्यापैकी एक मध्य आशियाई उड्डाण मार्ग आहे, ज्यामध्ये ३० राष्ट्रांमधून स्थलांतरित पक्ष्यांचे मार्ग समाविष्ट आहेत, त्यातील बहुतांश मार्ग भारतामधून जातो.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) तर्फे मध्य आशियाई उड्डाण मार्ग: महाराष्ट्रातील पक्षीशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशात स्थलांतरित पाणपक्ष्यांची स्थिती स्पष्ट करणे असा प्रकल्प राबविला जात आहे आणि त्यांनी अलीकडेच त्याचा पहिला वार्षिक अहवाल (जुलै २०२१-जून २०२२) कांदळवन प्रतिष्ठानला सादर केला. मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनने बीएनएचएसला २.७७ कोटींचा पाच वर्षांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी कार्यान्वित केले आहे.पाणथळ प्रदेशांचे संरक्षण केल्याने आम्हाला आमची शाश्वत विकास उद्दिष्टे आणि मध्य आशियाई उड्डाण मार्गावरील जागतिक समुदायाप्रती वचनबद्धता साध्य करण्यात मदत होईल. जी पंतप्रधानांनी फेब्रुवारी २०२० मध्ये गांधीनगर येथे झालेल्या CMS COP 13 अधिवेशनादरम्यान जाहीर केली होती.

- वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष व कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठाननाशिकमधील नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य (रामसर जागा), औरंगाबादमधील जायकवाडी पक्षी अभयारण्य, नाशिकमधील गंगापूर धरण, सोलापूरमधील उजनी धरण, जळगावमधील हातनूर धरण आणि अहमदनगरमधील विसापूर धरण अशा महाराष्ट्रातील सहा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांची निवड करण्यात आली. स्थलांतरित पाणपक्ष्यांची हंगामी आणि जागा वापर पद्धत अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला आहे. एप्रिल २०२२ मध्ये उजनी धरणातून सर्वाधिक ५८ पाणपक्षी प्रजातींची विविधता आणि सर्वाधिक २०,९७७ पाणपक्ष्यांची नोंद झाली.दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या प्रजातींच्या विशेष संदर्भासह, स्थलांतरित तसेच निवासी पक्ष्यांना आधार देण्यासाठी या पाणथळ प्रदेशांची भूमिका या अभ्यासात निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पादरम्यान, बीएनएचएस ने बर्ड मॉनिटरिंग सर्व्हे, बर्ड ट्रॅपिंग, बर्ड रिंगिंग आणि कलर बँडिंग असे विविध सर्वेक्षण केले आहेत. “Threatened and near-threatened असलेल्या प्रजाती, मध्य आशियाई उड्डाण मार्ग प्राधान्य प्रजाती आणि मध्य आशियाई उड्डाण मार्ग संवर्धन संबंधित प्रजातींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले गेले. भारताच्या मध्य आशियाई उड्डाण मार्ग राष्ट्रीय कृती योजनेमध्ये प्राधान्य असलेल्या सहा प्रजातींचीही अभ्यासाच्या कालावधीत नोंद घेण्यात आली होती, असे या अभ्यासात नमूद केले आहे.सर्वेक्षण दरम्यान नोंद केलेल्या महत्वाच्या प्रजाती म्हणजेच Black-tailed godwit, Greater Flamingo, Ferruginous Duck, Common Pochard, Curlew Sandpiper, आणि Little Stint were हे या पक्ष्यांपैकी काही पक्षी होते.उजनी (३०६) आणि जायकवाडी (२५९) येथे सर्वाधिक River tern दिसले. Asian Woollyneck, Painted stork, Black-headed Ibis, आणि Oriental Darter या प्रजाती आढळल्या. उजनीमध्ये मोठ्या संख्येने (२०४१) Black-tailed Godwit दिसले.शेतीचे वाहून जाणारे पाणी, सांडपाणी आणि प्रदूषित पाणी यामुळे होणारे जलप्रदूषण हे सर्व सहा पाणथळ जागेंवर आढळून आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे. 

टॅग्स :मुंबई