विक्रम: दर दीड मिनिटाला एका विमानाचे टेक ऑफ; मुंबई विमानतळाचा नवा उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 07:15 AM2023-11-16T07:15:28+5:302023-11-16T07:15:36+5:30

पाच लाख प्रवाशांनी दोन दिवसांत केला प्रवास

Record: One plane takes off every minute and a half; Mumbai Airport's new high | विक्रम: दर दीड मिनिटाला एका विमानाचे टेक ऑफ; मुंबई विमानतळाचा नवा उच्चांक

विक्रम: दर दीड मिनिटाला एका विमानाचे टेक ऑफ; मुंबई विमानतळाचा नवा उच्चांक

मुंबई : मुंबईविमानतळावरून ११ नोव्हेंबर या दिवशी प्रत्येक तासाला एकूण ४३ विमानांनी उड्डाण व लँडिंग केले. केले. म्हणजेच दर सव्वा ते दीड मिनिटांत एका विमानाने एकतर उड्डाण तरी वा लँडिंग तरी केले. या व्यस्त विमान वाहतुकीमुळे एका दिवसात १,०३२ विमानांच्या वाहतुकीचा नवा विक्रम मुंबई विमानतळाने प्रस्थापित केला आहे. मुंबईत दिवसाकाठी ९५० च्या आसपास विमान वाहतूक होते. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना आपल्या फेऱ्या वाढवण्यास अनुमती दिल्यामुळे आता विमान वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. 

दोन दिवसांतले चित्र...
११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान एकूण २,८९३ विमानांची वाहतूक झाली. 
२,१३७ विमानांनी देशांतर्गत प्रवासासाठी उड्डाण केले तर ७५७ विमानांनी परदेशासाठी उड्डाण केले. 
तीन लाख ५४ हजार ५४१ लोकांनी देशांतर्गत प्रवास केला.
एक लाख ६२ हजार २३१ प्रवासी परदेशात रवाना झाले. 

...तर वाहतूक आणखी वाढली असती!

मुंबईमध्ये जरी दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना समांतर नाहीत. त्या अधिक चिन्हाप्रमाणे एकमेकांना छेदून जातात. त्यामुळे एकाचवेळी विमानाचे लँडिंग किंवा उड्डाण शक्य नाही. जर मुंबई विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या असत्या तर मुंबईची विमान वाहतूक आणखी वाढली असती.

 ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान... 

उपलब्ध माहितीनुसार, ११ ते १३ नोव्हेंबर अशा दिवाळीच्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्येने पाच लाख १६ हजार ५६२ प्रवाशांसह नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यापैकी ११ नोव्हेंबर या एका दिवशी मुंबई विमानतळावर तब्बल १,०३१ विमानांची वाहतूक नोंदली गेली. २०१८ साली मुंबई विमानतळावर १,००४ असा विमान वाहतुकीचा उच्चांक नोंदला गेला होता. तो उच्चांक या नव्या वाहतुकीच्या आकड्यांनी मोडला आहे. दिल्लीनंतर मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ असून सणासुदीच्या हंगामाखेरीज दिवसाकाठी येथून ९५० पेक्षा जास्त विमानांची वाहतूक होते.

Web Title: Record: One plane takes off every minute and a half; Mumbai Airport's new high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.