Join us

आयपीजी जाहिरात कंपनीच्या सीईओचा जबाब नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:08 AM

अटक आरोपीच्या फोनचा रेकॉर्ड लवकरच सीआययूच्या हाती...आयपीजी जाहिरात कंपनीच्या सीईओचा जबाब नोंदटीआरपी घोटाळा : अटक आरोपीच्या फोनचा ...

अटक आरोपीच्या फोनचा रेकॉर्ड लवकरच सीआययूच्या हाती...

आयपीजी जाहिरात कंपनीच्या सीईओचा जबाब नोंद

टीआरपी घोटाळा : अटक आरोपीच्या फोनचा रेकॉर्ड लवकरच सीआययूच्या हाती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आयपीजी या जाहिरात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शशि सिन्हा यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे, तसेच आतापर्यंत अटक केलेल्या १५ आरोपींच्या फोन, लॅपटॉपमधील नेमकी माहिती लवकरच गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या हाती लागणार आहे. त्यांच्या जप्त केलेल्या मोबाइलसह अन्य उपकरणांचा फॉरेन्सिक अहवाल सीआययूला मिळणार आहे.

सीआययूने आतापर्यंत टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाइंड असलेल्या पार्थो दासगुप्ता यांच्यासह १५ जणांना अटक केली आहे. त्यापैकी १२ आरोपींविरोधात याआधी आरोपपत्र दाखल केले होते. ११ जानेवारी रोजी दासगुप्ता यांच्यासह बीएआरसीचे सीओओ रोमील रामगडिया आणि एआरजी आऊटलायर कंपनीचे सीईओ विकास खानचंदानी यांच्याविरोधात गुन्हे शाखेने ३६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. अटक आरोपीच्या मोबाइल, लॅपटॉपचा फॉरेन्सिक अहवाल सीआययूला मिळणार आहे. यातून टीआरपी घोटाळ्यातील आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा उभा करण्यास पथकाला मदत होणार आहे. यातच आयपीजी या नामांकित जाहिरात कंपनीचे सीईओ शशी सिन्हा यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. सिन्हा हे बीएआरसीचेही सदस्य आहेत. त्यांच्या जबाबात रिपब्लिक वाहिनीचे अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.