Join us

वॉकथॉनला विक्रमी प्रतिसाद

By admin | Published: November 07, 2015 11:41 PM

सायबर सिटीकडून नवी मुंबईची स्मार्ट सिटीकडे गतीमान वाटचाल सुरु असताना स्मार्ट सिटी निर्मितीत नागरिकांच्या संकल्पना-सूचना यांचा प्रामुख्याने समावेश

नवी मुंबई : सायबर सिटीकडून नवी मुंबईची स्मार्ट सिटीकडे गतीमान वाटचाल सुरु असताना स्मार्ट सिटी निर्मितीत नागरिकांच्या संकल्पना-सूचना यांचा प्रामुख्याने समावेश असावा याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी स्मार्ट सिटी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ५००० हजारहून अधिक फुग्यांव्दारे स्मार्ट नवी मुंबई चॅलेंजचे संदेश फलक हवेत सोडून महापौर सुधाकर सोनवणे यांनी झेंडा दाखवून या वॉकेथॉनला सुरुवात झाली. नेरु ळच्या डि.ए.व्ही. पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन आणि मार्चपास सादर केले. करावे येथील महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारीक लेझीम सादरीकरण करत एन.एम.एम.सी. ही अक्षरे अभिनव लेझीम रचनेतून निर्माण केली. या उपक्रमातंर्गत १४ हजाराहून अधिक विद्यार्थी बेलापूरच्या दिशेने वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले तसेच १३ हजाराहून अधिक विद्यार्थी नेरु ळच्या दिशेने वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले. २७ हजाराहून अधिक विद्यार्थी आणि नागरिक यांच्या सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झालेल्या या विक्र मी उपक्र मातून नवी मुंबई स्वच्छ व स्मार्ट बनविण्याचा संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारीत करण्यात आला. तसेच नागरिकांनी फेसबुक व ट्विटर पेजवरही संकल्पना नोंदविता येणार असून स्मार्ट सिटीच्या संकल्पना या ठिकाणी मांडता येणार आहे. विद्यार्थी नागरिकांसह इतक्या मोठ्या संख्येने एकित्रत येऊन स्मार्ट सिटी होणारच असा निर्धार या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तसेच या शहरासाठी आपले योगदान देण्याचे ठरविले. यावेळी नवी मुंबईचे एकात्म रुप प्रदर्शित झाले. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, आ. मंदाताई म्हात्रे, आ. नरेंद्र पाटील, उपमहापौर अविनाश लाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)विक्रमी नोंद२७ हजाराहून अधिक विद्यार्थी व नागरिक यांच्या सहयोगाने यशस्वी झालेल्या हा उपक्र म लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदला जाणार असून ही समस्त नवी मुंबईकर नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट ठरणार असल्याचे या स्मार्ट सिटी उपक्रमातंर्गत नवी मुंबईकरांना लिखीत सूचना पत्रे भरून तसेच स्मार्ट नवी मुंबई सिटी विषयीच्या आपल्या सूचना, संकल्पना मोठ्या प्रमाणावर मांडण्याची संधी नागरिकांना मिळाल्याने शहराच्या विकासात नागरिकांचे अमूल्य योगदान ठरणार आहे.- स्मार्ट सिटी उपक्रमातंर्गत शहर स्वच्छ राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून या कार्यक्रमातंर्गत उपस्थित मान्यवर, विद्याथीर्, शिक्षक आणि नागरिकांनी सामुहीकरित्या शपथ ग्रहण केली. शहर स्वच्छ राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून या शहराचा नागरिक म्हणून या कर्त्यव्याचे पालन करण्याची शपथ या ठिकाणी घेण्यात आली. शिस्तबद्ध आयोजन स्मार्ट सिटी वॉकेथॉनसाठी सकाळी सात वाजेपासून विद्यार्थी या नियोजित स्थळी उपस्थित होते. शिस्तबध्द पध्दतीने सर्व शाळकरी विद्यार्थी नेमून दिलेल्या जागी उपस्थित होते. यामध्ये सहभागी झालेल्या शाळेच्या शिक्षकांनीही विदयार्थ्यांना रांगेत उभे करण्यापासून त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी पेलत शिक्षकांनीही या स्मार्ट सिटी वॉकेथॉनसाठी उत्तम सहकार्य केले. यामध्ये विद्यार्थ्यांमधील शिस्त तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित विद्यार्थी या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.- सुप्रसिद्ध गायकर जोसेफ ब्रदर्स यांनी स्त्री आत्मसन्मान आणि सक्षमीकरण, एकात्मता या विषयांवर रॅप म्युझकिल गीते सादर केली. नवी मुंबई श्हराचा आदर्श जगासमोर ठेवायचा आहे अशाप्रकारे नवी मुंबई इज द स्मार्ट सिटी हे रॅप साँग सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमवेत उत्स्फुर्तपणे सूर धरत आय एम स्मार्ट - आय एम नवी मुंबईअसा जयघोष केला.