Join us

‘त्या’ तरुणीचा अर्धवट जबाब नोंदवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:06 AM

धनंजय मुंडे कथित बलात्कार प्रकरण‘त्या’ तरुणीचा अर्धवट जबाब नोंदवलाउर्वरित आज नाेंदवणार : धनंजय मुंडे कथित बलात्कार प्रकरण...

धनंजय मुंडे कथित बलात्कार प्रकरण

‘त्या’ तरुणीचा अर्धवट जबाब नोंदवला

उर्वरित आज नाेंदवणार : धनंजय मुंडे कथित बलात्कार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीचा शुक्रवारी डी. एन. नगर येथील एसीपी कार्यालयात अर्धवट जबाब नोंदवण्यात आला, तर उर्वरित जबाब शुक्रवारी नोंदविला जाणार आहे. यात मुंडे यांचाही जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

तरुणीचे वकील रमेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेले चार दिवस ओशिवरा पोलिसांकडे तक्रार नोंदवून घेण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. मात्र, कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. अखेर, गुरुवारी दुपारी १२ वाजता डी. एन. नगर येथील एसीपी कार्यालयात दाखल झालो. विविध चाैकशीत ताटकळत ठेवल्याने उर्वरित जबाब शुक्रवारी नोंदविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ११ वाजता एसीपी कार्यालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तक्रारदार तरुणी ही पार्श्वगायिका असून, मुंडे यांची जवळची नातेवाईक आहे. तिच्या तक्रारीनुसार, २००६ मध्ये घरात एकटी असताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. पुढे दर दोन ते तीन दिवसांनी तिच्यावर अत्याचार सुरू होते. याचे व्हिडिओही त्यांनी काढले. त्यानंतर वारंवार फोन करून प्रेमाची गळ घालण्यास सुरुवात केली. पुढे गायिका होण्यासाठी बड्या सेलिब्रिटी, चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत भेट घालून बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याचे स्वप्न दाखवत अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

* हेगडे, धुरी यांचे आराेप खाेटे

भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनीष धुरी यांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा रमेश त्रिपाठी यांनी केले आहे. त्यांची नेमकी तक्रार अद्याप हाती आलेली नाही. त्यानुसार त्यांंच्याविराेधात योग्य ती कायदेशीर भूमिका घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

................................