३० वर्षांपुढील इमारतींची पुनर्तपासणीच्या सूचना
By admin | Published: August 5, 2015 01:39 AM2015-08-05T01:39:54+5:302015-08-05T01:39:54+5:30
मुंबई आणि ठाणे येथील धोकादायक सेक्टरचे स्ट्रक्चरल अॅडिट करण्यात येत आहे. पण त्यामधील ३० वर्षांपुढील ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या केलेल्या
ठाणे : मुंबई आणि ठाणे येथील धोकादायक सेक्टरचे स्ट्रक्चरल अॅडिट करण्यात येत आहे. पण त्यामधील ३० वर्षांपुढील ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या केलेल्या स्ट्रक्चरल अॅडिटच्या पुनर्तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनास केल्याची माहिती गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांनी ठाण्यात मंगळवारी दिली.
नौपाड्यातील बी-कॅबिन येथे तळ अधिक तीनमजली श्रीकृष्ण निवास इमारत मध्यरात्री कोसळली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी पाहणी केली. तसेच या घटनेत जखमींची ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन त्यांनी विचारपूस केली. याप्रसंगी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते.
ढिगारा उचलण्यासाठी १२ डम्पर
नौपाड्यात मध्यरात्री कोसळलेल्या इमारतीचे रॅबीट उचलण्याचे काम महापालिकेने तातडीने युद्धपातळीवर सुरू केले
आहे. ते उचलण्यासाठी तीन जेसीबी आणि बारा डम्परची मदत घेऊन तो डम्पिंगवर टाकण्यात आला. ही पडलेली इमारत पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आली. हा ढिगारा उचलताना लाखोंच्या रोकडबरोबर घरगुती सामान तसेच डम्पिंगवर नेलेल्या रॅबीटमधील मौल्यवान वस्तू पोलिसांच्या निगराणीखाली जमा करण्यात येत होत्या.
होत्याचे नव्हते झाले
इमारतीच्या तळमजल्यावर राजाराम गुहागरकर यांचे गजानन फर्निचर नामक दुकान होते. याच दुकानावर १९७० पासून त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू होता. ते या दुर्दैवी घटनेत जमीनदोस्त झाले आहे.
तसेच तेथे त्यांची पत्नी आजारी असताना जवळपास १५ वर्षे त्यांनी संसार केला. तर १० वर्षांपूर्वीच ते कु टुंब तेथून समोरील इमारती राहण्यास गेले होते.
इमारत पडल्याची घटना दोन वाजता समजताच तातडीने धाव घेतल्यावर होत्याचे नव्हते झाल्याचे पाहण्यास मिळाले. यामध्ये त्यांचे सुतारकामाचे साहित्य, सायकल, कपाट तसेच काचेचे टेबल असे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
(प्रतिनिधी)