मुंबई - राज्यात तब्बल सात महिन्यांनंतर आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. राज्यात सोमवारी एकूण 5,092 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज दिवसभरात 8232 रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. आजही राज्यातील एक्टीव्ह कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 96,372 एवढी आहे. मात्र, कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 91.71 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर कमी झाल्याचं दिसून येतं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आज जनतेला संबोधित करताना कोरोना अद्यापही आपल्यात आहे. त्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना कालावधीतील नियम पाळण्याचं आवाहन केलंय. तसेच, दिवाळीत फटाके न वाजवता प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत असून रिकव्हरी रेट वाढत आहे. मात्र, दुसऱ्या लाटीची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहनही सरकारकडून करण्यात येत आहे.
देशातील कोरोना महामारीचं संकट कमी होताना दिसत असून सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रातही कोरोनाचा रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यात आजपर्यंत 15,77,322 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 96,72 रुग्णच एक्टीव्ह आहेत.