गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वसुली

By admin | Published: March 30, 2016 02:39 AM2016-03-30T02:39:06+5:302016-03-30T02:39:06+5:30

खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची धमकी देऊन पोलिसांनी दोन लाखांच्या खंडणीची मागणी केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्याचे

Recovery by threatening to file an offense | गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वसुली

गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वसुली

Next

मुंबई: खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची धमकी देऊन पोलिसांनी दोन लाखांच्या खंडणीची मागणी केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बाळासाहेब भाऊसाहेब काठे व हवालदार नारायण दत्तू घेरडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली.
पोलीस ठाण्याच्या आवारात ४० हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले. पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहात असलेला एक वाहन चालक हा पोलिसांचा खबरी म्हणूनही काम करतो. त्याच्या एका मित्राने व्यापाऱ्याकडे खंडणी मागितल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास करणाऱ्या उपनिरीक्षक काठे व हवालदार घेरडे यांनी याप्रकरणामध्ये वाहनचालकालाही सहआरोपी करण्याची धमकी दाखवून २ लाखांची मागणी केली. फिर्यादीने काठे व घेरडे यांच्याशी चर्चा करीत अखेर ४० हजार रुपये देण्याचे मान्य केले. अखेर मंगळवारी दुपारी त्याच्याकडून रक्कम घेत असताना दोघांना पथकाने रंगेहाथ पकडले. (प्रतिनिधी)

Web Title: Recovery by threatening to file an offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.