विद्यापीठाची पुनर्मूल्यांकनातून कमाई; मात्र खर्चही तसाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 03:04 AM2018-12-02T03:04:04+5:302018-12-02T03:04:06+5:30

पुनर्मूल्यांकनाच्या निकालावरून मुंबई विद्यापीठ चांगलेच चर्चेत आले आहे.

Recovery of the University earns; But the cost is the same | विद्यापीठाची पुनर्मूल्यांकनातून कमाई; मात्र खर्चही तसाच

विद्यापीठाची पुनर्मूल्यांकनातून कमाई; मात्र खर्चही तसाच

Next

मुंबई : पुनर्मूल्यांकनाच्या निकालावरून मुंबई विद्यापीठ चांगलेच चर्चेत आले आहे. पुनर्मूल्यांकनाच्या अर्जाद्वारे मुंबई विद्यापीठाने सुमारे १२ कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे. असे असले, तरी २०१३ ते २०१६ या वर्षात उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यावर मुंबई विद्यापीठाने एकूण ७ लाख १७ हजार इतका खर्च केल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कमाईच्या तुलनेत खर्चही जवळपास तेवढाच असून, ही रक्कम परीक्षकांना उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी देण्यात आली आहे.
आतापर्यंत पुनर्मूल्यांकन हा मुंबई विद्यापीठाच्या उत्पन्नाचा स्रोत अशी टीका होत होती. पुनर्मूल्यांकन करण्याऐवजी आधीच पेपर चांगले तपासल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल, असे मत विद्यार्थी, पालकांकडून व्यक्त करण्यात येत होते. त्यातच आता या पुनर्मूल्यांकनाचा खर्चही अधिक असल्याचे, आरटीआय कार्यकर्ते विहार दुर्गे यांना माहितीच्या अधिकारांतर्गत विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार समोर आले आहे.
>केवळ पेपर तपासनिसांचीच कमाई
पुनर्मूल्यांकनाच्या शुल्काद्वारे विद्यापीठाने २०१५ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत १२ कोटी ९ लाख ४१० रुपयांची कमाई केली आहे. मात्र, यासाठी विद्यापीठाला ७ लाखांहून अधिक रक्कमही मोजावी लागली आहे. याचा अर्थ, पुनर्मूल्यांकनात केवळ पेपर तपासनिसांचीच कमाई होत असल्याचेही समोर आले आहे.
>मुंबई विद्यापीठाचा पुनर्मूल्यांकनावरील खर्च (रुपयांमध्ये)
वर्ष (कालावधी) उत्तरपत्रिकांचा
मूल्यांकन खर्च
१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ २,३२०१४
१ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ २,२७,०८९
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ २,५७,०४६

Web Title: Recovery of the University earns; But the cost is the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.