नागरिकांच्या सहभागाने मनोरंजन मैदान २० वर्षांनंतर झाले खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:06 AM2020-12-25T04:06:12+5:302020-12-25T04:06:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रभाग क्रमांक ५२ गोरेगाव (पूर्व) मोहन गोखले रोडच्या धीरज वॅली टॉवर रहिवासी संकुलासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रभाग क्रमांक ५२ गोरेगाव (पूर्व) मोहन गोखले रोडच्या धीरज वॅली टॉवर रहिवासी संकुलासाठी राखीव असलेले मनोरंजन मैदान नागरिकांच्या सहभागाने २० वर्षांनंतर अलीकडेच खुले करण्यात आले.
सदर भूखंड गेली अनेक वर्षे डेब्रिज तसेच रानटी गवत यांनी वेढलेला होता. बांधकाम व्यावसायिकाने जाणीवपूर्वक हा भूखंड नागरिकांना सुपूर्द करण्यासाठी टाळाटाळ सुरू केली होती.
ही बाब येथील नागरिकांच्या प्रतिनिधींनी प्रभाग क्रमांक ५२च्या भाजप नगरसेविका प्रीती सातम यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी महापालिका प्रशासनाशी पाठपुरावा केला. रहिवाशांच्या सहभागातून या ठिकाणी स्वच्छता केली. तसेच डेब्रिज हटवून मैदान समतोल करून व फेसिंग करून फिरण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी तयार करण्यात आले.
नागरिकांच्या सहभागातून पहिल्यांदाच या प्रभागात अशा पद्धतीने मनोरंजन मैदान तयार झाल्याबद्दल नगरसेविका सातम यांनी पालिका प्रशासन व नागरिकांचे आभार मानले.
-----------------------------------