Join us

एमएमआरडीए येथे १७ हजार पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 2:14 AM

एमएमआरडीएच्या कंत्राटदाराकडील १७ हजार पदांच्या भरतीकरिता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय आॅनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन आहे.

मुंबई - एमएमआरडीएच्या कंत्राटदाराकडील १७ हजार पदांच्या भरतीकरिता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय आॅनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाईल. ठाणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने ६ ते ८ जुलै २०२० या कालावधीत, तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी ८ ते १२ जुलै २०२० या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर आॅनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

टॅग्स :नोकरीएमएमआरडीएमुंबई