महापालिकेत तंत्रकुशल २०६ पदांची भरती, तीन महिन्यात प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 06:00 AM2020-07-12T06:00:17+5:302020-07-12T06:00:43+5:30

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू केले आहेत. या ठिकाणी निमवैद्यकीय संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Recruitment of 206 technical posts in NMC, process in three months | महापालिकेत तंत्रकुशल २०६ पदांची भरती, तीन महिन्यात प्रक्रिया

महापालिकेत तंत्रकुशल २०६ पदांची भरती, तीन महिन्यात प्रक्रिया

Next

मुंबई : महापालिकेमार्फत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ अशा २०६ जागांची भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात या मनुष्यबळाची मदत घेण्यात येणार आहे. रुग्णांसाठी स्थापन केलेले उपचार केंद्र व विविध रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर तीन महिन्यांकरिता ही पदे भरली जाणार आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू केले आहेत. या ठिकाणी निमवैद्यकीय संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन महिन्यांसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ व औषध निर्माता अशी एकूण २०६ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांकरिता दरमहा ३० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
या ठिकाणी काम करण्यास इच्छुक उमेदवारांनी २४ जुलैपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळता) व्यक्तिश: स. ११ ते सायं. ४.३० वाजेपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. मात्र यासाठी के.बी. भाभा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ.आर.के. पाटकर मार्ग, वांद्रे पश्चिम या ठिकाणीच अर्ज करता येईल.

Web Title: Recruitment of 206 technical posts in NMC, process in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.