चारशे बोगस उमेदवारांची भरती

By admin | Published: December 8, 2015 01:07 AM2015-12-08T01:07:05+5:302015-12-08T01:07:05+5:30

पालिकेच्या अनुकंपा भरती घोटाळ्याप्रकरणी मुख्य पर्यवेक्षकासह पाच जण सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. आरोपींच्या चौकशीत ४००हून अधिक बोगस उमेदवार सध्या

Recruitment of 400 bogus candidates | चारशे बोगस उमेदवारांची भरती

चारशे बोगस उमेदवारांची भरती

Next

मुंबई : पालिकेच्या अनुकंपा भरती घोटाळ्याप्रकरणी मुख्य पर्यवेक्षकासह पाच जण सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. आरोपींच्या चौकशीत ४००हून अधिक बोगस उमेदवार सध्या पालिकेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली. अटक आरोपींच्या घरांच्या झडतीत या भरती प्रक्रियेत वापरण्यात येत असलेले बनावट स्टॅम्प, परवानगीपत्रांसह महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा दस्तऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुंबई महानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात येणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील सफाई कामगारांच्या भरती घोटाळ्याप्रकरणी डी विभागाचा मुख्य पर्यवेक्षक देवजी प्रेमजी राठोडसह दलाल सनी विनोद विंजुडा, कुणाल नागजी जोगदिया, लिपिक दिलीप चौकेकर, शिपाई अनिल कांजी बारिया हे पाच जण अटकेत आहेत. अटकेत असलेल्या आरोपींपैकी सनी हा दलाल नसून पालिकेच्या डी विभागातील सफाई कामगार असल्याची माहिती तपासात उघड झाली. त्यांच्या चौकशीत बोगस उमेदवारांचा आकडा ४००पेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये गुन्हे शाखेकडून गेल्या ५ वर्षांतील उमेदवारांच्या माहितीचा शोध वेगाने सुरू आहे. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांसह बोगस उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आरोपींच्या घर झडतीमध्ये पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Recruitment of 400 bogus candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.