* सुशिक्षित युवकांना संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुप्तचर विभागात (आयबी) विविध दर्जाच्या ५२७ अधिकारी पदांची लवकरच भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत या सेवेत काम करण्याची सुशिक्षित तरुणांना मोठी संधी मिळाली आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.
देशाची सुरक्षा कायम राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या आयबीमध्ये अनेक वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात विविध पदांसाठी भरती केली जात आहे. त्यामध्ये उपसंचालकाची दोन तर, उपमध्यवर्ती माहिती अधिकाऱ्याची १०, कनिष्ठ माहिती अधिकाऱ्याच्या १६८, वरिष्ठ संशोधक, संशोधक सहायक प्रत्येकी २ आणि सहायक मध्यवर्ती अधिकाऱ्याच्या १५४ पदांचा समावेश आहे. या जागांबाबत केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे, इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.