Join us

म्हाडामध्ये होणार ५३४ कर्मचाऱ्यांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 2:18 AM

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयासह राज्यातील म्हाडाच्या अन्य कार्यालयांमध्येही कामे आणि मनुष्यबळाची संख्या व्यस्त आहे.

मुंबई : वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयासह राज्यातील म्हाडाच्या अन्य कार्यालयांमध्येही कामे आणि मनुष्यबळाची संख्या व्यस्त आहे. सध्या म्हाडाच्या विविध कार्यालयांत सुमारे सातशेहून अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र सद्य:स्थितीत म्हाडामध्ये ५३४ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.

गृहनिर्माण प्रकल्प, लॉटरी पात्रता पडताळणी, पुनर्विकास योजना, संक्रमण शिबिरांशी संबंधित कामांसाठी कर्मचाऱ्यांची मोठी गरज भासते. वांद्रेतील मुख्यालयासह राज्यातील अन्य कार्यालयांमध्येही कामे आणि मनुष्यबळाची संख्या व्यस्त आहे. यासाठी सुमारे ५३४ कर्मचाऱ्यांची तत्काळ भरती करण्याचा निर्णय पूर्वीच म्हाडाने घेतला आहे. मात्र मराठा आरक्षण आणि विधानसभा निवडणुका यामुळे ही प्रक्रिया थांबली होती. आता मराठा आरक्षणालाही मंजुरी मिळाली असल्याने तसेच राज्य सरकारही स्थिरस्थावर झाले असल्याने लवकरच भरतीची जाहिरात काढली जाणार असल्याचे समजते.

गेली काही वर्षे म्हाडामध्ये कंत्राटी पद्धतीने काम कारणाºया कामगार आणि कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे म्हाडातील अधिकाऱ्याने सांगितले. म्हाडामधील कर्मचाºयांची भरती ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये होणार होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली. आता सरकार स्थापन झाले असल्याने ही मेगाभरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी, असे म्हाडातील अधिकाऱ्यांचे देखील म्हणणे आहे.

गेली अनेक वर्षे म्हाडाकडे कामाचे प्रमाण वाढले तरी कर्मचारीसंख्या वाढली नव्हती. कमी कर्मचारी आणि अधिक काम यावर उपाय म्हणून कंत्राटी पद्धतीने हंगामी तत्त्वावर कामगार आणि कर्मचारी यांची भरती करून त्यांच्याकडून कमी पगारात काम करून घेतले जात होते. या कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कर्मचाºयांप्रमाणे पगार आणि भत्तेही नव्हते. आता त्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून, म्हाडा नियमानुसार शर्ती आणि अटी यांची पूर्तता केल्यास त्यांना संधी मिळेल.

म्हाडाचे मुख्यालय मुंबईत असून राज्याच्या अन्य भागांत विभागीय कार्यालये आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अन्य कर्मचाºयांवर ताण पडत आहे. म्हाडाच्या कोकण विभागाची व गिरणी कामगारांची लॉटरीही लवकरच निघणार असल्याने कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर मोठा ताण पडणार असल्याने कर्मचारी भरती होणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

टॅग्स :म्हाडामुंबईमहाराष्ट्र