Join us

राज्यात २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती; सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 9:08 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.

मुंबई : राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांची भरती सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याशिवाय मानधनात वाढ, सेविकांना नवीन मोबाईल, विमा अशा विविध घोषणा करून मुख्यमंत्री शिंदे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात गिफ्ट दिले आहे. 

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उपस्थित होते. राज्यभरात १ लाख १० हजार अंगणवाड्या असून, त्यातील २ लाख ७ हजार पदांपैकी काही पदे रिक्त आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी एलआयसीकडे पाठपुरावा करा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

बैठकीतील निर्णय

  • अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेऊन महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रांतील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्यासंदर्भात आदेश द्यावेत.
  • कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल.
  • पोषण आहाराचा दर वाढविण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार
टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार