खासगी बँकांतील कर्मचारी भरतीचा वेग कायम राहणार
By admin | Published: June 20, 2014 11:42 PM2014-06-20T23:42:22+5:302014-06-20T23:42:22+5:30
देशातील खासगी बँकांकडून कर्मचारी भरतीला वेग येणार आहे.
Next
>मुंबई : देशातील खासगी बँकांकडून कर्मचारी भरतीला वेग येणार आहे. अर्थव्यवस्था मंदीचा सामना करीत असताना आणि उद्योग क्षेत्रत अस्थिर वातावरणाचा सामना करावा लागत असतानाही या बँकांकडून ही भरती केली जाणार आहे. अनेक बँकांच्या कर्मचा:यांची संख्या गेल्या 5 वर्षात दुप्पट झाली आहे.
मार्च 2क्1क् मध्ये 35 हजार 256 कर्मचारी संख्या असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या कर्मचा:यांची संख्या आता 72 हजार 226 झाली आहे. एचडीएफसी बँकेच्या कर्मचा:यांच्या संख्येतही 51 हजार 888 वरून 68 हजार 165 र्पयत वाढ झाल्याचे दिसून येते. अॅक्सिस बँकेचे 5 वर्षापूर्वी 42 हजार 42क् कर्मचारी होते. आता या बँकेच्या कर्मचा:यांची संख्याही दुप्पट झाली आहे.
येस बँक आणि इंडसइंड बँकही कर्मचारी भरतीला प्राधान्य देत आहेत.
अर्थव्यवस्था गती घेईल, या अपेक्षेतून अनेक बँका भरती करीत आहेत. काही बँका आपला व्यवसाय वाढविण्यासाठी पायाभूत बाबींकडेही अधिक लक्ष देत आहेत. कर्मचारी भरतीत खासगी बँका आघाडीवर असल्या, तरी गेल्या काही वर्षाची गती पाहता नजीकच्या काळात ती तशीच राहील, असे आपल्याला वाटत नाही, असे आश्विन पारेख अॅडव्हायजरी सव्र्हिसचे व्यवस्थापकीय भागीदार आश्विन पारेख यांनी सांगितले.
बँक वरचेवर आपल्या व्यवसाय धोरणाचा आढावा घेत असते. या आढाव्यानंतर त्यानुसार काही बदल करीत असते. अशी पुनर्रचना केल्याने कार्यक्षमतेत फरक पडतो आणि व्यवसायाच्या आकडय़ांत त्याचे प्रत्यंतर येते, असे मत बँकेच्या प्रवक्त्याने व्यक्त केले.
अशा त:हेने पुनर्रचना करताना कर्मचा:यांबाबत संवेदनशील राहून विचार केला जातो, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
(प्रतिनिधी)
4व्यवसायवृद्धीची गती कमी झाल्याने आता या बँका प्रति कर्मचारी व्यवसाय आणि नफ्याच्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करतील, असेही काही विश्लेषकांना वाटते.
4गेल्या 5 वर्षात खासगी बँकांतील कर्मचा:यांच्या कार्यक्षमतेत फारशी वाढ झालेली नाही. आयसीआयसीआय बँकेचे उदाहरण घेतल्यास गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या प्रतिकर्मचारी व्यवसायाचे प्रमाण 7 कोटी 47 लाख रुपये होते. 2क्क्9-1क् मध्ये ते 1क् कोटी 29 लाख रुपये इतके हाते.