Join us  

मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर; ६ महिन्यांपासून प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 12:06 PM

जलशुद्धीकरण प्रकल्पात २५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध

मुंबई : पावसाने मारलेल्या दडीमुळे आधीच पाणीकपातीचे संकट गडद होऊन मुंबईकरांवरपाणीकपातीची टांगती तलवार आहे. त्यामुळे एकीकडे मुंबईकरांची पाण्याची तहान भागविण्यासाठी पालिकेकडून नवीन जल प्रकल्प हाती घेण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे जल शुद्धीकरण प्रक्रियेत वाया जाणाऱ्या पाण्याचीही पुनर्वापर प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त २५ दशलक्ष जलशुद्धीकरणासाठी उपलब्ध होत आहे.

हा प्रकल्प पालिकेच्या पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. लिटर पाणी मुंबई शहराचा पाणीपुरवठा ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असून, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात ही प्रक्रिया पार पाडली जाते. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी विविध बेड तयार केले असून, गोधरा सँड (वाळू) वापरून तयार केलेल्या या बेडवर पाणी स्थिर ठेवण्यात येते. या वाळूमधून पार होत फिल्टर झालेले पाणी खाली जमा होते.

२४ तासांनंतर काढला जातो गाळ

या बेडमध्ये जमा झालेला गाळ बॅक वॉशिंग प्रक्रियेद्वारे २४ तासांनी काढण्यात येतो. या संपूर्ण प्रक्रियेत जमा झालेला गाळ मोठ्या टाकीमध्ये जमा होतो आणि स्लज ट्रीटमेंट प्लांटला पाठविला जातो आणि त्यातून शुद्ध केलेले पाणी पुन्हा या प्रकल्पात प्रक्रियेसाठी पाठविले जाते. यादरम्यान शुद्धीकरण प्रक्रियेत वाया जाणाच्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी पुन्हा कसे वापरता येईल, यासाठी सहा महिन्यांपूर्वी पालिकेने पुनर्वापर प्रक्रिया प्रकल्प सुरु केला आहे. यामधून दिवसाला २५ किंवा पावसाळ्यात त्याहून अधिक पाणी शुद्धीकरणासाठी उपलब्ध होत असल्याची माहिती पालिकेचे मुख्य जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली. या आधी शुद्धीकरण प्रक्रियेत वाया जाणारे पाणी जवळपासच्या नद्या, नाल्यांमध्ये दिले जात होते. 

पाण्याच्या पुनर्वापराचा उपयोग काय?

मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा होतो, त्यातही सर्वाधिक पाणीपुरवठा भातसा धरणातून होत असल्याने जल शुद्धीकरण केंद्रात त्यामधून | येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया होते. | पुनर्वापर प्रक्रियेमुळे उपलब्ध झालेल्या २५ ते ३० दशलक्ष पाण्यामुळे पालिकेला तिथून घ्याव्या लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण यामुळे कमी होते.

टॅग्स :पाणीमुंबई