Lockdown: लाल, हिरवा, पिवळा स्टीकर...! खासगी वाहनांना रस्त्यावर फिरण्यासाठी कलर कोड जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 06:30 AM2021-04-18T06:30:46+5:302021-04-18T06:31:17+5:30

Color code for essential services in Mumbai: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करूनही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Red, green, yellow ...! Issue color codes for private vehicles to travel on the road in Lockdown | Lockdown: लाल, हिरवा, पिवळा स्टीकर...! खासगी वाहनांना रस्त्यावर फिरण्यासाठी कलर कोड जारी

Lockdown: लाल, हिरवा, पिवळा स्टीकर...! खासगी वाहनांना रस्त्यावर फिरण्यासाठी कलर कोड जारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करूनही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर फिरण्यास परवानगी असून, अत्यावश्यक सेवेसाठी खासगी वाहनांना आता रंगीत स्टीकर लावावे लागतील, त्याव्यतिरिक्त अन्य गाड्यांवर कारवाई केली जाईल.


डॉक्टर व आरोग्यसेवकासाठी लाल, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूच्या विक्रीच्या वाहनावर हिरवा आणि सरकारी व अन्य महत्त्वाच्या व्यक्तीच्या वाहनांवर पिवळ्या रंगाचे स्टीकर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वाहनाच्या पुढील व मागील बाजूला ६ इंच आकाराचे गोल स्टीकर लावायचे आहे. त्याव्यतिरिक्त अन्य वाहने आणि कलर कोडचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त  हेमंत नगराळे दिला आहे. प्रमुख मार्ग व नाक्यावर शनिवारी रात्रीपासून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

उल्लंघनावर करडी नजर
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कलर कोड दिला जाणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. गाड्यांमधील कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत का? याची तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस, महापालिका, पत्रकार, डॉक्टर, अशा प्रकारे पोस्टर लावून कोणी फायदा घेत आहे का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
राज्य सरकारने 
जारी केलेल्या नियमांनुसार आपण लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत आहोत. महत्त्वाच्या चेक नाका, टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस्‌, रुग्णवाहिका, रुग्णालये यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे आपण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी कलर कोड सुरू करत आहोत.
- हेमंत नगराळे, 


दिवसांसाठी राज्यात संचारबंदी जारी केली आहे. मात्र, तरीही सार्वजनिक ठिकाणी नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी तीन रंगांचे स्टीकर लावण्याचा निर्णय शनिवारपासून घेण्यात आला आहे.मुंबई पोलीस आयुक्त 

Web Title: Red, green, yellow ...! Issue color codes for private vehicles to travel on the road in Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.