Join us  

बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडा करणार

By admin | Published: January 14, 2016 2:29 AM

मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येईल आणि तो दर्जेदारच असला पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका बैठकीत दिले.

- मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येईल आणि तो दर्जेदारच असला पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका बैठकीत दिले. या चाळींच्या पुनर्विकासाबाबत म्हाडातर्फे एक सादरीकरण आज मुख्यमंत्र्यांसमोर मंत्रालयात करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. झेंडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, बीडीडी चाळीतील रहिवाशांना जास्तीत जास्त क्षेत्रफळाचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने बीडीडी चाळींची पुनर्बांधणी करताना तेथील रहिवाशांना चांगल्या सुविधा आणि जास्तीत जास्त लाभ मिळेल, याप्रमाणे प्रकल्पाची आखणी करण्यात यावी. (विशेष प्रतिनिधी)