Join us

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही. अफवांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रकल्प ठरल्याप्रमाणे शापुरजी पालनजी यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. रहिवाशांना अजून चांगल्या प्रकारे सुविधा देण्याबाबत अंतिम टप्प्यात निर्णय घेण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेला प्रकल्प सर्व तांत्रिक अडचणी दूर करून वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, या सगळ्या मुद्द्यांमुळे आता बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती मिळणार याची शाश्वती निर्माण झाली आहे, असा विश्वास ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी व्यक्त केला.

ना. म. जोशी बीडीडी चाळ पुनर्विकासासंदर्भात आमदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बीडीडी चाळ पुनर्विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली. अनेक मुद्द्यांवर स्पष्ट आणि ठामपणे चर्चा करण्यात आली, असे कृष्णकांत नलगे यांनी सांगितले. दरम्यान, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीच्या वतीने आपला प्रकल्प रखडल्याप्रकरणी आणि शासनाला जाग यावी यासाठी वरळी जांबोरी मैदान येथे उपोषण करण्याचे नियोजित केले होते. मात्र, यासंदर्भात वरळी पोलीस ठाण्याकडे परवनागीसाठी अर्ज केला असता पोलीस ठाण्याकडून परवनागी नाकारण्यात आली आहे. उपोषण केल्यास नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.