सीएसएमटी स्थानकासारखा बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:06 AM2021-09-24T04:06:56+5:302021-09-24T04:06:56+5:30

मुंबई : सीएसएमटी स्थानक हद्दीच्या पुनर्विकासासारख्या गजबजलेल्या बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय भारतीय पुनर्विकास मंडळाने घेतला आहे. गेल्या ...

Redevelopment of Borivali station like CSMT station | सीएसएमटी स्थानकासारखा बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास

सीएसएमटी स्थानकासारखा बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास

Next

मुंबई : सीएसएमटी स्थानक हद्दीच्या पुनर्विकासासारख्या गजबजलेल्या बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय भारतीय पुनर्विकास मंडळाने घेतला आहे.

गेल्या काही वर्षांत पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील बोरिवली स्थानकातील प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. सध्या कोरोनाकाळात या स्थानकाची दररोज प्रवासी संख्या पावणेदोन लाख असली तरी २०१७ ते २०१८ मध्ये प्रवासी संख्या २ लाख ९३ हजार इतकी होती. ती वाढून तीन लाखाहून अधिक झाली आहे.

उपनगरात घर घेण्याकडे वाढलेला कल आणि रस्ते प्रवास करताना होणारी वाहतूक कोंडी यामुळे अनेक जण लोकलचाच पर्याय निवडतात. परिणामी प्रवासी संख्या वाढतच आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांत वाढत जाणारी प्रवासी संख्या पाहता, बोरिवली स्थानकात प्रवासी संख्या पाहता बोरिवली स्थानकात प्रवासी सुविधांचीही भर पडली. यात फलाट, पादचारी पूल, सरकते जिने इत्यादी सुविधात वाढ झाली. बोरिवली स्थानकात १० फलाट असून, पाच पादचारी पूल, सात सरकते जिने, सात उदवाहक आहेत. आणखी तीन सरकत्या जिन्याचीही भर पडणार आहे.

सध्या असलेल्या पादचारी पुलांना स्कायवॉकचीही जोड दिली आहे. तसेच पश्चिमेला प्रवाशांना स्थानकापर्यंत येण्यासाठी डेकही उपलब्ध केला आहे. या स्थानकाच्या पश्चिम आणि पूर्वेला असलेल्या रेल्वेच्या हद्दीचा आणखी विकास करता येतो का, याची चाचपणी आयआर एसडीसीकडून केली जाणार आहे. सीएसएमटी स्थानक हद्दीच्या पुनर्विकासासारखा बोरिवली स्थानकाचा विकास करण्याचा विचार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाईल, अशी माहिती देण्यात आली. वाहनतळ, स्थानक अपंगस्नेही करणे, आगमन-निर्गमनचे वेगवेगळे भाग करणे, इत्यादी सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न असणार आहे.

* कल्याणचाही प्रस्ताव

सीएसएमटी स्थानकाला गती देतानाच कल्याण स्थानकाचाही आराखडा अंतिम टप्प्यात आहे. लवकर कंपन्यांसाठी प्रस्ताव काढला जाणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Redevelopment of Borivali station like CSMT station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.