CSMT: सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास सप्टेंबरपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 08:17 AM2023-06-29T08:17:25+5:302023-06-29T08:17:50+5:30
CSMT : ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकासाचे प्रत्यक्ष बांधकाम पावसाळ्यानंतर अर्थात सप्टेंबरमध्ये सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी दिली.
मुंबई - ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकासाचे प्रत्यक्ष बांधकाम पावसाळ्यानंतर अर्थात सप्टेंबरमध्ये सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी दिली. १८ हजार कोटींच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीमध्ये केले होते. भूमिपूजन झाल्यावर प्रत्यक्ष बांधकाम सुरू कधी होणार, याची प्रतीक्षा केली जात आहे.
सीएसएमटी पुनर्विकास करताना परिसरातील रेल्वे इमारती अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कंत्राटदारांकडून सीएसएमटीची पाहणी पूर्ण झाली असून पावसाळ्यानंतर इमारती, कार्यालये स्थलांतरित हाेतील.