पुनर्विकासापूर्वी रहिवाशांना विश्वासात घेतलेच पाहिजे
By admin | Published: January 16, 2016 02:02 AM2016-01-16T02:02:39+5:302016-01-16T02:02:39+5:30
नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळी या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी बीडीडी चाळींतील रहिवाशांना
मुंबई : नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळी या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी बीडीडी चाळींतील रहिवाशांना विश्वासात न घेता हा निर्णय जाहीर केल्याने बीडीडी चाळ उपक्रम सेवा समिती आक्रमक झाली आहे. पुनर्विकासापूर्वी समितीला विश्वासात न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडामार्फत जोरदार प्रयत्न सुरू आहेत. म्हाडाने चाळींच्या पुनर्विकासाबाबत वास्तुविशारदांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. त्यानुसार नुकतेच मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
परंतु येथील संघटनांना विश्वासात न घेतल्याने सर्व चाळींतील संघटनांची गुरुवारी बैठक पार पडली. पुनर्विकासापूर्वी शासनाने विश्वासात न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पुनर्विकास समिती नेमा
चाळींचा पुनर्विकास करताना एक पुनर्विकास समिती तयार करावी, रहिवाशांना विश्वासात न घेता पुनर्विकासाचा निर्णय झाल्यास त्याविरोधात समिती तीव्र आंदोलन सुरू करेल, असा इशारा समितीचे चिटणीस राजू चव्हाण यांनी दिला आहे.