मुंबई : मुंबईतील रेडीरेकनरचे दर ०.६ टक्क्यांनी कमी झाले असले तरी शहरांतील ८७३ झोनपैकी फक्त ३८ झोनमधल्या निवासी भागांचेच दर कमी झाले. १९० झोनमधील दर जैसे थे आहेत. तब्बल ३३९ ठिकाणचे दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढले असून १० टक्क्यांपर्यंत दरवाढ झालेल्या झोनची संख्या १७० आहे. त्यामुळे मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्राला रेडीरेकनर दरांच्या सरासरी कपातीचा फायदा होणार नाही. जेथे दर वाढले तिथल्या खरेदी-विक्री व्यवहारांना या बदलांचा फटकाच बसेल.राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात घसघशीत सवलत दिल्याने कोरोनामुळे व्यवसाय डळमळीत झालेल्या बांधकाम व्यावसायिकांत आनंदाचे वातावरण होते. रेडीरेकनरचे दरही सरकार १० ते १२ टक्क्यांनी कमी करेल अशी आशा होती. मात्र, त्या दरांमध्ये सरासरी १.७२ टक्के वाढ करून सरकारने त्यांना धक्का दिला आहे.सरकारी निर्णयानुसार मुंबईतले दर ०.६ टक्क्यांनी कमी झाले. मात्र, केवळ जमीन आणि थोड्याफार प्रमाणात औद्योगिक आस्थापनांच्या दरांमध्ये सर्वाधिक कपात झाली असून निवासी, व्यापारी आणि कार्यालयीन जागांना ठोस फायदा होणार नाही. याशिवाय निवासी आणि कार्यालयीन जागांचे दर कमी झालेल्या झोनपेक्षा दर वाढलेल्या झोनची संख्या जास्त आहे.मुंबईतील अॅड. विनोद संपत, अॅड. तेजस दोशी आणि अॅड. धर्मेन संपत यांनी सरकारने दिलेल्या रेडीरेकनर दरांचा सखोल अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.मुंबईतील ७८३ पैकी तब्बल ६०१ झोनमधील भाव ‘जैसे थे’मुंबईतील ७८३ झोनपैकी तब्बल ६०१ झोनमधील भाव जैसे थे आहेत. १५ झोनमध्ये भाव कमी झाले असून, १२१ झोनमधील दरांमध्ये वाढ झाली आहे. औद्योगिक आस्थापनांच्या ४४८ झोनमध्ये ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. तर, कार्यालयीन जागा २५ झोनमध्येच स्वस्त झाल्या.यंदा मुंबईत काही झोनचे विभाजन करून नव्याने १३६ झोन तयार केले आहेत. त्यामुळे एकूण झोन ८७३ झाले आहेत. एका परिसरातील वेगवेगळ्या झोनमध्ये कमी-अधिक प्रमाणात रेडीरेकनरचा दर बदलला आहे. त्यामुळे विशिष्ट भागांतील दर घसरले किंवा वाढले असा थेट निष्कर्ष काढता येत नाही.दरांमधली घट आणि वाढ जमीन निवासी कार्यालयीन व्यापारी औद्योगिक१० टक्क्यांपेक्षा जास्त घट १३ २ १ २ ११० टक्क्यांपर्यंत घट २९ १ २ १ १०५ टक्क्यांपर्यंत घट ४४१ ३५ २२ १२ ११२जैसे थे २८ १९० ३७७ ६०१ १६७५ टक्क्यांपर्यंत वाढ १५३ ३३९ २०८ ८९ २८२१० टक्क्यांपर्यंत वाढ ७२ १७० १२५ ३२ १६५१० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ १ ० २ ० १
मुंबईतील रेडीरेकनरची दरकपात फसवी; ५८ टक्के भागांत पाच ते दहा टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 4:40 AM