‘धारावीचा पुनर्विकास लवकर करा’

By admin | Published: June 28, 2017 03:43 AM2017-06-28T03:43:13+5:302017-06-28T03:43:13+5:30

धारावी पुनर्विकासासाठी जागतिक निविदेत विकासक पुढे येत नसल्याने धारावी सेक्टर एक ते चारचा पुनर्विकास सरकार स्वत:च करणार आहे.

'Reduce redevelopment of Dharavi' | ‘धारावीचा पुनर्विकास लवकर करा’

‘धारावीचा पुनर्विकास लवकर करा’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावी पुनर्विकासासाठी जागतिक निविदेत विकासक पुढे येत नसल्याने धारावी सेक्टर एक ते चारचा पुनर्विकास सरकार स्वत:च करणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती डीआरपी सेक्टर एक रहिवासी कृती संघाने दिली. संघाच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असताना मुख्यमंत्र्यांनीच याबाबतची माहिती दिल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात करण्यात आली. मात्र धारावीच्या पुनर्विकासासाठी ठोस प्रयत्न करण्यात येत नसल्याचे मुद्दे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान मांडले. परिणामी धारावीचा पुनर्विकास कार्यक्रम लवकर हाती घेण्यात यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

Web Title: 'Reduce redevelopment of Dharavi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.