टाटा संचालकांच्या मानधनात कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:15 AM2020-05-26T00:15:27+5:302020-05-26T00:15:45+5:30
टाटा समूहातील प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष व सीईओ पुढीलप्रमाणे आहेत.
मुंबई : कोरोना विषाणूने भल्याभल्यांना जेरीस आणले आहे. त्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. बलाढ्य अशा टाटा समूहाने मूळ कंपनी टाटा सन्स सकट सर्व कंपन्यांच्या संचालकांच्या मानधनात जवळपास २० टक्के कपात केली आहे. खर्च कमी करण्यासाठी अशा प्रकारचे पाऊल उचलण्याचा हा प्रकार टाटा समूहाच्या १५२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच घडला आहे.
टाटा समूहातील प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष व सीईओ पुढीलप्रमाणे आहेत. टाटा सन्स- एन चंद्रशेखरन, टाटा मोटर्स-गुंथर बस्चेक, टाटा स्टील- टी.व्ही. नरेंद्रन, टायटन इंडस्ट्रीज - भास्कर भट, इंडियन हॉटेल्स कंपनी- पुनीत चटवाल व व्होल्टास- प्रदीप बक्षी यांच्या मानधनात
दोन ते १९ टक्के कपात झाली आहे.
अशी होणार कपात
कंपनी अध्यक्ष वार्षिक मानधन कपात
(कोटी रु.) टक्के
टाटा सन्स एन. चंद्रशेखरन ६५.५२ १९
टाटा मोटर्स गुंथर बस्चेक २६.२९ २
टीसीएस राजेश गोपीनाथन १३.३८ १७
टाटा स्टील टी.व्ही. नरेंद्रन ११.२३ १९
टायटन इंड. भास्कर भट ६.९३ १५
इंडियन हॉटेल्स पुनीत चटवाल ६.०२ —
व्होल्टास प्रदीप बक्षी ४.५१ —