Join us  

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांच्या संख्येत घट; ५५ टक्के अपघात झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 10:33 AM

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या दोन वर्षांत अपघातांची संख्या घटल्याचे दिसून आले आहे.

मुंबई :  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या दोन वर्षांत अपघातांची संख्या घटल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर फक्त १९८ अपघातांची नोंद झाली, तर यंदा मेपर्यंत ५७ अपघातांची नोंद झाली आहे.

गेल्या सात वर्षांची आकडेवारी लक्षात घेता या महामार्गावर जवळपास एक हजार ६८८ अपघात झाले असून, या अपघातात ५८४ जणांना जीव गमवावा लागला आहे, तर महामार्गावर ‘अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना’ केल्यामुळे अपघातांची संख्या कमी झाल्याचा दावा महामार्ग पोलिसांनी केला आहे.

महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार २०१७ मध्ये मुंबई-पुणे महामार्गावर जवळपास ३६० अपघातांची नोंद करण्यात आली होती. या अपघातांमध्ये एकूण १०५ जणांना जीव गमवावा लागला होता. तर १४७ जण गंभीररित्या जखमी झाले होते, तर किरकोळ जखमी प्रवाशांची संख्या ४४ होती. 

यंदा जून २०२३ पर्यंत ७० अपघातांची नोंद झाली असून, त्यात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५४ जण गंभीर जखमी झाले आहेत तर १९ जण किरकोळ जखमी झाले. 

गेल्या वर्षीही २०२१च्या तुलनेत अपघातांची संख्या कमी नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी १९८ अपघातांची नोंद झाली होती, तर २०२१ मध्ये अपघातांची संख्या दोनशेच्या घरात होती. २०२२ मध्ये झालेल्या एकूण १९८ अपघातांत ९२ जणांचा मृत्यू झाला होता, तर ११४ जण गंभीर जखमी झाले 

टॅग्स :मुंबईमहामार्ग