विशेषाधिकारात कपात

By admin | Published: May 13, 2016 03:46 AM2016-05-13T03:46:35+5:302016-05-13T03:46:35+5:30

विकास नियोजन आराखड्यातील काही शिफारशींमुळे पालिका आयुक्त अजय मेहता यांच्यावर टीकेची झोड उठली़ मात्र मेहता यांनी आयुक्तांना असलेल्या विशेषाधिकारातच कपात करण्याची शिफारस केली

Reduction of privilege | विशेषाधिकारात कपात

विशेषाधिकारात कपात

Next

मुंबई : विकास नियोजन आराखड्यातील काही शिफारशींमुळे पालिका आयुक्त अजय मेहता यांच्यावर टीकेची झोड उठली़ मात्र मेहता यांनी आयुक्तांना असलेल्या विशेषाधिकारातच कपात करण्याची शिफारस केली आहे़ एमआरटीपी कायद्यांतर्गत असलेल्या चार परवानग्या वगळता आयुक्तस्तरावरील ३१पैकी २१ परवानग्या कमी करण्यात आल्या आहेत़
२०१४ ते २०३४ या २० वर्षांचा नियोजन आराखडा तयार झाला आहे़ पहिल्या आराखड्यात त्रुटी असल्याने सुधारित आराखडा तयार केला जात आहे़ या आराखड्यातील तरतूद पालिकेच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येत आहे़ त्यानुसार आता आयुक्तांच्या नवीन शिफारशींनी अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत़ आयुक्तस्तरांवर देण्यात येणाऱ्या ३५ परवानग्यांमध्ये थेट २१ परवानग्यांचे अधिकार खुद्द आयुक्तांनीच छाटले आहेत़ (प्रतिनिधी)
>>> इमारतीच्या स्टील्ट, पोडियममध्ये विद्युत उपकेंद्र देण्याची परवानगी़
नियोजनातील निर्बंधामुळे पोकळी निर्माण होत असल्यास ती चटईक्षेत्र निर्देशांक मुक्त करणे़
प्रस्तावित पार्किंग जागा या आवश्यक असणाऱ्या पार्किंग जागांपेक्षा कमी असल्यास त्याबाबत सूट देणे़
नियमित आकाराची खोली देण्याऐवजी बहुउद्देशीय खोली देण्याबाबतची परवानगी़
आवश्यक असणाऱ्या पार्किंग जागांपैकी
५० टक्क्यांपेक्षा जास्त लहान पार्किंग जागा देण्याची परवानगी़
अधिमूल्य आकारून दुकाने, उपाहारगृहे, डुप्लेक्स सदनिका यासाठी आतील जिन्याबाबत चटईक्षेत्र निर्देशांकात परिगणन न करता परवानगी देणे़
आवश्यकतेपेक्षा जास्त सदनिका घनता देण्याबाबतची परवानगी़
दीड हजार चौ़मी़पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या भूखंडावर पोडियमची परवानगी देणे़
भूखंडालगतच्या किमान ६ मी़ रुंदीच्या दोन रस्त्यांनी प्रवेश मार्ग असल्यास इमारतीचा विकास ७० मी़पर्यंत उंच करण्याची परवानगी
देणे़
>>इमारतीलगतच्या मोकळ्या जागेतील कमतरतांबाबत सूट देणे़
अनुमत फंजीबल चटईक्षेत्र निर्देशांकास परवानगी देणे़
जिना, जिन्याची लॉबी, उद्ववाहनाची नॉबी यांच्या क्षेत्राबाबत चटईक्षेत्र निर्देशांक परिगणन न करण्याकरिता परवानगी़
मुंबई वारसा जतन समितीचे ना हरकत प्रमाणपत्र २४ मी़ किंवा त्याहून अधिक उंचीच्या इमारती वारसा विभागात असल्यास बंधनकारक करू नये याविषयी परवानगी़
जिन्याची रुंदी पुरेशी नसल्याबाबत सूट देण्याची परवानगी़
इमारतीच्या दर्शनी मोकळ्या जागेमध्ये प्रस्तावित लोखंडी पायऱ्यांबाबत परवानगी़
आवश्यक असलेल्या दुसऱ्या जिन्याबाबत सूट देण्याची परवानगी़
विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्रमांक ३३ २ अन्वये तांत्रिक व वैद्यकीय संस्था आणि संस्था इमारती, शासकीय इमारती आणि निमशासकीय कार्यालयाच्या इमारती, सार्वजनिक उपक्रमाच्या इमारती आणि तांत्रिक संस्था, विभागीय इमारती यांना देण्यात येणाऱ्या अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाची परवानगी़

Web Title: Reduction of privilege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.