Join us

जागतिक घटनांचे प्रतिबिंब इतिहासाच्या प्रयोगशाळेत; डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयात अनोखे कला प्रदर्शन

By स्नेहा मोरे | Published: January 03, 2024 7:56 PM

भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या प्रांगणात विशेष प्रकल्प दालनात प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

मुंबई: केरळच्या टि.व्ही. संथोष आगळ्या वेगळ्या संकल्पनेवरील 'इतिहासाची प्रयोगशाळा आणि  ठसठसणाऱ्या वेदनांचं रुदन' कला प्रदर्शन मुंबईकरांच्या भेटीस आणले आहे. भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या प्रांगणात विशेष प्रकल्प दालनात प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन कला रसिकांसाठी ११ फेब्रुवारीपर्यंत खुले राहणार आहे. काळानुकाळ जगभरात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब संथोष यांनी त्यांच्या सृजनशील कलाकृतींतून मांडले आहे.

टि.व्ही. संथोष यांनी समाज आणि इतिहासाचा मागोवा घेताना युद्ध आणि हिंसेचे विस्ताराने पृथक्करण आर्ट इन्स्टॉलेशनमध्ये साकारले आहे. तर समज आणि वास्तविकतेवर परिणाम करणारा माध्यमांचा हस्तक्षेप, यावर त्यांनी कलाकृतीतून भाष्य केल्याचे दिसते. जलरंग, कॅनव्हास आणि शिल्पांचा समावेश असलेल्या या कलाकृती, दृश्य संस्कृती, कलाअभ्यास आणि संवादांतून उलगडलेल्या कलात्मक विचारप्रणालीचा आलेख उलगडतात. या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, वीकेण्डच्या दिवशी थेट टि.व्ही संथोष यांच्यासह कला रसिकांना हे प्रदर्शन जाणून घेण्याचीही संधी मिळणार आहे. संग्रहालयाने याकरिता वॉकथ्रूचे आयोजन केले आहे. त्यामुळे इतिहास, संशोधन शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन निश्चितच पर्वणी ठरणारे आहे.

अन् जोडले जाते जागतिक घटनांशी नाते - टी व्ही संथोष, कलाकारइतिहास संघर्ष आणि युद्धाच्या कथांनी भरलेला आहे. जो जवळजवळ क्रिया आणि प्रतिक्रियांच्या अंतहीन साखळीप्रमाणे आहे,  जो मानवतेची गडद बाजू उघड करतो. आणि जेव्हा इतिहासाकडून सध्याच्या जागतिक घडामोडींकडे लक्ष वळवता, तेव्हा मोठ्या प्रमाणात हे वृत्तमाध्यम आहे, जे बाह्य जगाशी असलेल्या आपल्या नातेसंबंध जोडते. बातम्यांचे अहवाल हे जगाविषयीचे  विस्तारित दृष्टीकोन म्हणून काम करतात जे कालांतराने  दैनंदिन अनुभवांचा एक भाग बनतात, टेलिव्हिजन स्क्रीनद्वारे किंवा बातम्यांच्या इतर प्रकारांद्वारे घरात प्रवेश करतात, अशा प्रकारे संघर्ष आणि हिंसा हे आपल्या रोजच्या परिचयाचा भाग बनले आहेत ही प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

टॅग्स :मुंबई