विद्यार्थ्यांना शुल्क परतावा द्या, नाहीतर कठोर कारवाई ; यूजीसीची उच्च शिक्षण संस्थांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 05:42 AM2024-07-15T05:42:45+5:302024-07-15T05:43:37+5:30

यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. निश्चित केलेल्या मुदतीपूर्वी प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क परत न केल्याबद्दल गेल्या चार वर्षांत अनेकदा नोटिसा देण्यात आल्या आणि परिपत्रकेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

Refund fees to students, otherwise strict action will be taken; UGC's Tambi to Higher Education Institutions | विद्यार्थ्यांना शुल्क परतावा द्या, नाहीतर कठोर कारवाई ; यूजीसीची उच्च शिक्षण संस्थांना तंबी

विद्यार्थ्यांना शुल्क परतावा द्या, नाहीतर कठोर कारवाई ; यूजीसीची उच्च शिक्षण संस्थांना तंबी

मुंबई : शुल्क परतावा धोरणाचे पालन न करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कारवाईचा इशारा दिला आहे. धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांच्या अभ्यासक्रमांची संलग्नता रोखणे, स्वायत्तता रद्द करणे वा अमान्य करणे अशा प्रकारची कारवाई केली जाणार आहे.

यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. निश्चित केलेल्या मुदतीपूर्वी प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क परत न केल्याबद्दल गेल्या चार वर्षांत अनेकदा नोटिसा देण्यात आल्या आणि परिपत्रकेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच डिसेंबर आणि मेमध्ये झालेल्या बैठकांमध्येही उच्च शिक्षण संस्थांनी शुल्क परतावा धोरण आणि शुल्क परतावा विनाविलंब करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरही संस्थांकडून त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता विद्यापीठांचे कुलगुरू, महाविद्यालयांच्या प्राचार्यांना शुल्क परताव्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

यूजीसीच्या पत्रकातील इशारा

            यूजीसीच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून उच्च शिक्षण संस्था शुल्क परताव्यास नकार देत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब चिंताजनक आहे.

            यूजीसीच्या धोरणाचे उल्लंघन केल्यामुळे ऑक्टोबर २०१८च्या परिपत्रकानुसार कारवाई केली जाऊ शकते. त्यात उल्लंघन करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांच्या मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांची मान्यता रोखणे, अर्ज न स्वीकारणे, अनुदान रोखणे, स्वायत्तता रद्द करणे, स्वायत्तता अमान्य करणे अशा प्रकारची कारवाई केली जाऊ शकते.

            नियमांचे पालन न केल्याबाबत संबंधित उच्चशिक्षण संस्थांबाबत वृत्तपत्रांत किंवा अन्य माध्यमांत नोटीस प्रसिद्ध करण्याचे यूजीसीला अधिकार आहेत.

Web Title: Refund fees to students, otherwise strict action will be taken; UGC's Tambi to Higher Education Institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.