आरोग्य विभागातील अधिका-यांमध्ये पदावरून भांडण
By admin | Published: February 26, 2015 10:51 PM2015-02-26T22:51:56+5:302015-02-26T22:51:56+5:30
स्वाइन फ्लूचा वाढता प्रसार रोखण्याऐवजी ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागातील अधिकारी हे अधिकारावरून भांडत असल्याची बाब गुरुवारी झालेल्या
ठाणे : स्वाइन फ्लूचा वाढता प्रसार रोखण्याऐवजी ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागातील अधिकारी हे अधिकारावरून भांडत असल्याची बाब गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. अखेर, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करीत एकीकडे स्वाइनमुळे ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात आले असताना तुम्ही अधिकारपदाच्या मुद्यावरून भांडत असाल तर ते चुकीचे असून स्वाइन फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी तत्काळ ठोस उपाययोजना करा, असे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.
आपल्या शहरातील खाजगी हॉस्पिटल्सला या रोगाविषयी माहिती देणारे फलक लावण्याच्या सूचना देणाऱ्या ठाणे महापालिकेच्याच एकाही हॉस्पिटलमध्ये असे फलक लावण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत महापालिकेच्या मालकीच्या सर्व इमारतींवर याविषयी माहिती देणारे फलक लावण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी दिले असून तसे न झाल्यास संबंधित विभागावर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनीदेखील या मुद्याला हात घालत तत्काळ उपाययोजनांची मागणी केली.