दिंडोशीच्या विविध प्रश्नांबाबत आमदार सुनील प्रभू यांनी केला पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा
By मनोहर कुंभेजकर | Published: June 19, 2024 06:07 PM2024-06-19T18:07:53+5:302024-06-19T18:08:58+5:30
कांदिवली पूर्व लोखंवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत, परंतू प्रत्यक्ष काम सुरू झाले नसून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची बाबत चर्चा केली.
मुंबई - मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची उद्धव सेनेचे आमदार सुनिल प्रभु यांनी आज भेट घेवून दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत पाठपुरावा केला. यावेळी संस्कार कॉलेज येथिल प्रस्तावित विकास नियोजन रस्ताच्या विकासाने बाधित घरांचे पुनर्वसन कुरार मध्ये सुरू असलेल्या एसआरएमध्ये करावे या बाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची व हा रस्ता लवकरात लवकर विकसित करून, वाहतुकीसाठी खुला करण्याची देखील विनंती केली. व अशा प्रकारचे आश्वासन अधिवेशनादरम्यान शासनाने दिल्याने ही प्रशासनाची देखील जबाबदारी असल्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले.
कांदिवली पूर्व लोखंवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत, परंतू प्रत्यक्ष काम सुरू झाले नसून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची बाबत चर्चा केली. तसेच दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील सर्वच ८ प्रभागामध्ये अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होते या करीता मुंबई महानगर पालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थे मार्फत दिंडोशी विधानसभा क्षेत्रात जास्त दाबाने आणि पुरेसा पाणीपुरवठा दिंडोशीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांमार्फत देण्याची विनंती केली. त्यांच प्रमाणे उपनगरातील हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय -जोगेश्वरी, शताब्दी रुग्णालय-कांदिवली, एस के पाटील रुग्णालय-मालाड, म. वा. देसाई रुग्णालय,गोविंद नगर, मालाड, कूरार व्हीलेज अप्पा पाडा येथील आरोग्य खात्याचे चिकित्सा केंद्र येथील अपुरी आरोग्य व्यवस्था व यामुळे होणारी नागरिकांची होणारी गैरसोय यावर उपाय योजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात बाबत चर्चा झाली.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नायर रुग्णालय, सायन रुग्णालय व के. ई. एम. रुग्णालय ही प्रमुख आरोग्य सेवा रुग्णालये असून या रुग्णालयांमध्ये मुंबई मधील पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे व शहरी भागातील नागरीक मोठ्या प्रामाणात आरोग्य सेवांचा लाभ घेतात. फक्त नायर रुग्णालयातच भरती असलेले सर्वसारधारण दहा ते बारा रुग्ण व नविन येणा- यापैकी दहा ते बारा रुग्णांची एमआरआय तपासणी सुचविली जाते. नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन मागील दोन वर्षांपासून बंद असून सदरहू एमआरआय मशीनचे आर्यमान २०१९ साली संपूष्टात आलेले असून सदरहू मशीन सुरु होत नाही व दुरुस्त देखील केली जाऊ शकत नाही. यामुळे नाईलाजाने येथे येणा-या चिकीत्सा पॅथोलॉजी लॅब मध्ये जावून जास्त पैसे देऊन एमआरआय चाचणी करुन घ्यावी लागते किवा सायन रुग्णालयात जावे जागते. यामुळे रुग्णांचे व रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होतात. यास्तव अत्यावश्यक खास बाब म्हणून नायर रुग्णालयात दोन एमआरआय मशीन बसविण्याची बाबत चर्चा केली.
शारदा ताई गोविंद पवार क्रीडांगणाचे सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच स्थानिक नागरिकांची आणि युवकांची मागणी असल्याने खेळाचे मोकळे मैदान ठेवण्यात यावे याबाबत चर्चा केली.
आमदार सुनिल प्रभु यांनी दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र.४१ मधील नागरी निवारा परिषद वसाहत, न्यू म्हाडा वसाहत, संतोष नगर, श्रीकृष्ण नगर या वस्त्यांमधील नागरिकांना वापरण्याकरीता असलेले स्व. मॉ. मिनाताई ठाकरे हे उद्यान असून त्या ठिकाणी नागरीकांची व लहान मुलांची व ज्येष्ठ नागरीकांची मोठया प्रमाणात वर्दळ असून या मैदानातील लहान मुलांच्या खेळाची माती खराब झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात दगड असल्याने लहान मुलांना दुखापत होण्याची शक्यता आहे. यामुळे येथे नविन मुरुम व चांगल्या प्रकारची लाल माती टाकण्यात यावी. खेळाच्या मैदानाला तारेचे कुंपण अथवा जाळी बसविण्यात यावी जेणेकरून बाहेर चालणा-या नागरीकांना क्रिकेट बॉल अथवा फूटबॉल लागून हजा होणार नाही. येथील वॉक-वेच्या मॅट्रेस खराब व असमतल झाल्याने या वॉकवेवरुन चालण्यासाठी नागरीकांना त्रास होतो. या क्रीडांगणात शौचालयाची सोय नसल्याने या ठिकाणी तात्काळ शौचालय बांधणे आवश्यक आहे. या मैदानातून लहान मुलांच्या खेळण्याची खेळणी नादुरुस्त झालेली असून सर्व खेळणी बदलून खेळण्यांच्या खाली सिंथेटिक मॅट किंवा आर्टीफिशीयल ग्रास बसविण्यात यावे,या मैदानात सुशोभित लाईट व रंगरंगोटी करून सौदर्गीकरण करण्यात याव अशी चर्चा देखील आमदार सुनिल प्रभु यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत केली.