कितीही संकट आले, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांची नोकरी कायम- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 06:03 AM2019-09-17T06:03:57+5:302019-09-17T06:04:10+5:30

ओला-उबेरमुळे बेस्ट बसलाही फटका बसला. आज देशात मंदी आहे, पण ही मंदी दीर्घकाळ राहणार नाही.

Regardless of the crisis, the best employees are always employed - Uddhav Thackeray | कितीही संकट आले, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांची नोकरी कायम- उद्धव ठाकरे

कितीही संकट आले, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांची नोकरी कायम- उद्धव ठाकरे

Next

मुंबई : ओला-उबेरमुळे बेस्ट बसलाही फटका बसला. आज देशात मंदी आहे, पण ही मंदी दीर्घकाळ राहणार नाही. काळानुसार सुधारणा करणे गरजेचे असल्याने बेस्टमध्येही सुधारणा होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेस्ट उपक्रमात खासगी वातानुकूलित बसगाड्या सुरू करण्यात येत आहेत. मात्र, कितीही संकटे आली, तरी बेस्टच्या एकाही कर्मचाºयाची नोकरी जाणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले.
बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील पाच मिनी वातानुकूलित बसगाड्या दाखल झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या बसगाड्यांचे लोकार्पण सोमवारी बेस्ट भवन येथे झाले. या कार्यक्रमास उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजपचे आ. राज पुरोहित, आयुक्त प्रवीण परदेशी, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर उपस्थित होते.
फोर्स कंपनीकडून घेण्यात आलेल्या ट्रॅव्हलर मिनी बसगाड्यांमध्ये २१ प्रवासी बसून तर सात प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात. या बसमध्ये चालक पुरवठादाराचा तर सुरुवातीच्या काळात वाहक बेस्टचा असेल. मात्र, नंतर एकाच मार्गावर या बस चालविणे नक्की झाले की, या बसगाडयांमध्ये वाहक नसेल, तसेच या एसी बसचे भाडे किमान सहा रुपये असेल, असे स्पष्ट करण्यात आले.
>आणखी एक हजार
गाड्या येणार
डिसेंबर अखेरपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एक हजार खासगी वातानुकूलित बसगाड्या दाखल होतील, अशी माहिती महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिली. डिझेलवर चालणाºया ४०० मिनी बसगाड्या सात वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २८४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
>भाडेतत्त्वावरील पाचशे बसेसना मंजुरी
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी बेस्ट उपक्रमाने सोमवारी तातडीने प्रस्ताव आणून पाचशे मिनी डिझेलवर चालणाºया बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. समितीच्या बैठकीत डिझेलवर धावणाºया ५०० बसेसच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न
बेस्टला बससेवा प्रवाशांना देताना प्रति किलो मीटरमागे ११० रुपये खर्च येतो. त्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्यानेच तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, आता बेस्टने भाडे तत्त्वावरील बसगाड्या सेवेत घेतल्याने बेस्टचा खर्च किमान २० रुपयांनी कमी होईल. त्यामुळे आगामी काळात बेस्ट ताफ्यात खासगी भाडे तत्त्वावरील तीन हजार बसेस घेण्यात येणार आहेत, असे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Regardless of the crisis, the best employees are always employed - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.