पाऊस विलंबाने तरीही पीक भरघोस

By admin | Published: November 3, 2014 11:01 PM2014-11-03T23:01:51+5:302014-11-03T23:01:51+5:30

दासगाव पट्ट्यातील बळीराजाने कापणीचा हंगाम सुरू केला नसल्याने होणाऱ्या थोड्याफार नुकसानीपासून तो बचावला आहे.

Regardless of the rain delay, increase the crop | पाऊस विलंबाने तरीही पीक भरघोस

पाऊस विलंबाने तरीही पीक भरघोस

Next

दासगाव : महाड तालुक्यातील दासगाव परिसरात खलाटीच्या भागात यंदा भात शेतीचे पिक उत्तम आले आहे. दरम्यान, चार दिवस पडलेल्या पावसामुळे महाड तालुक्यातील काही भागात कापणीचा हंगाम सुरू असताना कापलेली भातपिके भिजल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. अशा परिस्थितीत दासगाव पट्ट्यातील बळीराजाने कापणीचा हंगाम सुरू केला नसल्याने होणाऱ्या थोड्याफार नुकसानीपासून तो बचावला आहे.
दासगाव परिसरातील भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाताची पिके घेतली जातात. या परिसरात शेकडो हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी रत्ना, कर्जत, सुवर्णा, महाबीज, एचएमटी, गुजरात, सह्याद्री यांसारख्या ९० ते १४० दिवसांपर्यंतचे पिक देणाया (गारवा, निमगारवा) वाणाचे बियाणे पेरले आहे.
जूनअखेर पाऊस सुरू होवून तो नियमितपणे पडल्यामुळे पिकाला उत्तम प्रकारे पोषक वातावरण मिळून पिकही भरघोस आले आहे. मुळात पावसाला विलंब झाल्यामुळे आता दासगावात कापणी हंगामाला उशिराने सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतमजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे भात कापणीचा प्रश्न उभा राहिला आहे.

Web Title: Regardless of the rain delay, increase the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.