मीरारोड : प्रादेशिक परिवहन विभागाच्या मीरा भाईंदर शहरातील घोडबंदर शिबिर व कार्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त शिकाऊ वाहन चालक व मोटार ट्रेनिंग शाळांच्या प्रतिनिधींना नियमांची माहिती व सुरक्षित वाहन चाळण्या बाबतचे धडे दिले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे, निरीक्षक दत्तात्रय खराडे, सहायक निरीक्षक वा. नि. ढोबळे, गुंजाळ, अडसूळ, आवार आदींच्या यांचा उपस्थितीत रस्ता सुरक्षा सप्ताह पार पडला.
वाहन चालवताना दुसऱ्यांच्या सह स्वतःचा जीव सुरक्षित राहील ह्यावर वाहन चालकाने प्राधान्य लक्ष ठेवले पाहिजे. आपल्या मागे आपले कुटुंबीय देखील आहेत याचा विचार करावा. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास रस्ते अपघात टाळता येतील असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. मीरारोड येथे प्रादेशिक परिवहन विभागाने रस्ता सुरक्षेचे धडे दिले.