शिक्षक मतदारसंघात नोंदणी करा!
By admin | Published: October 24, 2016 04:33 AM2016-10-24T04:33:23+5:302016-10-24T04:33:23+5:30
मुंबईतील शाळांमध्ये अध्यापनाचे काम करणारे, पण कोकणातील रहिवासी असलेल्या शिक्षकांची नोंदणी करण्याचे आदेश, शिक्षण निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत
शिक्षण निरीक्षक : मुख्याध्यापकांना आदेश
मुंबई : मुंबईतील शाळांमध्ये अध्यापनाचे काम करणारे, पण कोकणातील रहिवासी असलेल्या शिक्षकांची नोंदणी करण्याचे आदेश, शिक्षण निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत. मात्र, त्यांची मतदार म्हणून नोंदणी कोकण मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे कोकण मतदारसंघातील निवडणूक आता चुरशीची होणार आहे.
कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक जानेवारी किंवा फेबुवारी २०१७ मध्ये होत आहे. या माध्यमातून विधान परिषदेत जाण्यासाठी शिक्षक प्रतिनिधींना संधी आहे. आपल्या मागण्या सातत्याने मांडणाऱ्या प्रतिनिधीला विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी शिक्षक मतदारही मोठ्या संख्येने मतदान करतात. मात्र, त्या आधी शिक्षक मतदार संघाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. गेल्या सहा वर्षांत कोणतीही किमान तीन वर्षे त्याने एका शाळेत किंवा एकापेक्षा अधिक शाळेत शिक्षक म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)