नोंदणी झाली, स्मार्ट कार्ड कधी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 05:53 AM2019-11-11T05:53:43+5:302019-11-11T05:53:55+5:30

राज्यभरातील एसटीच्या आगारातून तब्बल १७ लाख प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे.

Registered, when will we get smart card? | नोंदणी झाली, स्मार्ट कार्ड कधी मिळणार?

नोंदणी झाली, स्मार्ट कार्ड कधी मिळणार?

Next

मुंबई : राज्यभरातील एसटीच्या आगारातून तब्बल १७ लाख प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. स्मार्ट कार्डची नोंदणी होऊनदेखील स्मार्ट कार्ड मिळाले नाही. तब्बल १५ लाखांवर ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी आगाराला फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे स्मार्ट कार्डची नोंदणी होऊनदेखील स्मार्ट कार्ड कधी मिळणार, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
एसटीच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ केला. ही स्मार्ट कार्ड योजना महाराष्ट्रातील १७ लाख प्रवाशांपर्यंत पोहोचली आहे. एसटीच्या ३१ विभाग आणि २५० डेपोमधून प्रवाशांनी स्मार्ट कार्डची नोंदणी केली आहे. एसटी प्रवासात वाहक आणि प्रवासी यांचा सुट्टे पैशांसाठी नेहमी वाद होत असत. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी एसटी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली.
एसटी महामंडळाने आधार संलग्न स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. यासाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले होते. स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी तांत्रिक बाबी अडचणीच्या ठरत होत्या. परिणामी, स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी आलेल्या ताटकळत उभे राहावे लागत होते. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, सवलतधारी प्रवाशांना यांचा मनस्ताप सहन करावा लागला. आता नोंदणी केल्यानंतर स्मार्ट कार्ड मिळाले नाही. त्यामुळे प्रवाशांच्या राज्यभरातील प्रत्येक आगारात फेºया माराव्या लागत आहेत.

Web Title: Registered, when will we get smart card?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.