पनवेलमध्ये ५० हजार नव्या मतदारांची नोंदणी

By admin | Published: October 12, 2014 10:50 PM2014-10-12T22:50:39+5:302014-10-12T22:50:39+5:30

पनवेल विधानसभा मतदार संघात जवळपास ५० हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढून या विधानसभा मतदार संघात विक्र मी नोंद होऊ शकेल,

Registration of 50,000 new voters in Panvel | पनवेलमध्ये ५० हजार नव्या मतदारांची नोंदणी

पनवेलमध्ये ५० हजार नव्या मतदारांची नोंदणी

Next

अलिबाग : पनवेल विधानसभा मतदार संघात जवळपास ५० हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढून या विधानसभा मतदार संघात विक्र मी नोंद होऊ शकेल, असा विश्वास जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भांगे यांनी रविवारी पनवेल येथे व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल विधानसभा मतदारसंघातील कामकाजाची पाहणी करण्यासाठी त्यांनी पनवेल येथे भेट दिली. त्यावेळी झालेल्या झोनल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय निवडणूक निरीक्षक (जनरल) बिनोदचंद्र झा, केंद्रीय निवडणूक निरीक्षक (जनजागृती) आर.एन.मिश्रा, पनवेल प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम परदेशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार पवन चांडक, पनवेल सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश चितळे उपस्थित होते.
पनवेल मतदारसंघात मतदार जनजागृतीअंतर्गत खूप चांगल्या प्रकारचे काम झाले असून मोठया प्रमाणात मतदारांची नोंद झाली आहे.
झोनल तसेच बुथ अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी हेच प्रत्यक्ष मतदानादरम्यान उपस्थित असतात. त्यासाठी झोनल अधिकाऱ्यांनी जागरुकतेने व दक्षतेने काम पहावे. मतदानासाठी आलेल्या प्रत्येक पात्र मतदाराचे मतदान होईल, अशा सूचना बुथ अधिकाऱ्यांना द्याव्यात असे त्यांनी अखेरीस सांगितले. मतदानाच्या दिवशी कोणताही गैरप्रकार होऊ नये, म्हणून जागोजागी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय पोलिंग बुथपासून ठराविक अंतरावर फिरण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Registration of 50,000 new voters in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.