Join us

अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांची आजपासून नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 2:46 AM

शालेय मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना नवीन तरतुदींची माहिती देण्यासाठी शिक्षण उपसंचालक विभागाने ऑनलाइन प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.

मुंबई : यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या महाविद्यालयीन नोंदणीसाठी १ जुलैपासून उपसंचालक कार्यालयाकडून प्रवेश प्रक्रियेची लिंक ओपन केली जाणार आहे. या लिंकच्या साहाय्याने महाविद्यालयांनी मागील वर्षी भरलेल्या माहितीत काही बदल करायचे असल्यास ते करू शकतील.

मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे लॉग इन आयडी व पासवर्ड २०१९-२० मध्ये नोंदणी केलेल्या माहितीतील नोंदणीकृत पत्त्यावर १ जुलै २०२० पासून पाठवण्यात येईल. महाविद्यालयांनी त्या लॉग इन, पासवर्डच्या साहाय्याने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीमध्ये काही बदल करायचा असल्यास अकरावी ऑनलाइनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करायचा आहे. तर, शालेय मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना नवीन तरतुदींची माहिती देण्यासाठी शिक्षण उपसंचालक विभागाने ऑनलाइन प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.

टॅग्स :विद्यार्थीशिक्षण