Join us

अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांची नोंदणी आजपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 6:38 PM

प्रवेशाच्या बदलतील तरतूदींबद्दल मुख्याध्यापक, प्राचार्यांना ऑनलाईन प्रशिक्षण

 

 

मुंबई : यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या महाविद्यालयीन नोंदणीसाठी १ जुलैपासून उपसंचालक कार्याकडून प्रवेश प्रक्रियेची लिंक ओपन केली जाणार आहे. या लिंकच्या सहाय्याने महाविद्यालयांनी मागील वर्षी भरलेल्या पाळ्या माहितीमध्ये काही बदल करावयाचे असल्यास ते करू शकणार आहेत. तसेच अकरावी प्रवेशप्रक्रिया उशिरा सुरु होणार असल्याने त्यात आणखी सुसूत्रता यावी आणि कमी वेळेत पूर्ण व्हावी या उद्देशाने अकरावी प्रवेश प्रक्रियेत काही नवीन तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शालेय मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्य यांना या नवीन तरतुदींची माहिती देण्यासाठी शिक्षण उपसंचालक विभागाकडून पुन्हा ऑनलाईन प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.२०१९-२० मध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले होते. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे लॉगिन आयडी व पासवर्ड २०१९-२० मध्ये नोंदणी केलेल्या माहितीतील आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर १ जुलै २०२० पासून पाठवण्यात येणार आहेत. महाविद्यालयांनी त्या लॉगिन, पासवर्डच्या सहाय्याने २०२०-२१ या वर्षाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीमध्ये काही बदल असल्यास तो अकरावी ऑनलाइनच्या अधिकृत संकेतस्थळावरू जाऊन करायचे असल्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक , प्राचार्यांना दिल्या आहेत.माहिती पुस्तिका ही ऑनलाईन मिळणारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन व्हावे याकरिता सर्व प्रक्रिया जास्तीत जास्त डिजिटली करण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करत आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेची छापील पुस्तिका न देता डिजिटल स्वरूपातील माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांना देण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. ही पुस्तिका पीडीएफ स्वरूपात, ऑनलाईन प्रणालीवर तसेच मोबाईल एप्लिकेशनवर उपलब्ध करून देता येईल.  इतकेच काय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश विद्यार्थ्यांना प्रक्रिया शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत मान्यता देण्यात यावी असे नवीन तरतुदींमध्ये सांगण्यात आले आहे. 

विभागनिहाय प्रशिक्षण पुढीलप्रमाणे होणार आहे -विभाग - तारीख - वेळदक्षिण मुंबई - १ जुलै २०२० - सकाळी ११ ते दुपारी १२पश्चिम मुंबई - १ जुलै २०२० - दुपारी १ ते २उत्तर मुंबई - १ जुलै २०२० - दुपारी ३ ते ४ठाणे मनपा / मिरा-भाईंदर मनपा - २ जुलै २०२० - सकाळी ११ ते दुपारी १२कल्याण-डोंबिवली मनपा - २ जुलै २०२० - दुपारी १ ते २नवी मुंबई मनपा / पनवेल / उल्हासनगर मनपा / अंबरनाथ नपा / बदलापूर नप - २ जुलै २०२० - दुपारी ३ ते ४

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्रलॉकडाऊन अनलॉकमुंबई