माहीम येथील रुग्णालयाची नोंदणी महापालिकेकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 06:10 AM2020-08-03T06:10:56+5:302020-08-03T06:11:30+5:30

चुकीच्या उपचारांचा आरोप; अधिक पैसे घेतल्याचा ठपका

The registration of the hospital at Mahim has been canceled by the Municipal Corporation | माहीम येथील रुग्णालयाची नोंदणी महापालिकेकडून रद्द

माहीम येथील रुग्णालयाची नोंदणी महापालिकेकडून रद्द

Next

मुंबई : कोरोना नसतानाही रुग्णावर कोरोनाचे उपचार करणे तसेच नोटीस बजावूनही न ऐकणाऱ्या माहीम येथील फॅमिली केअर रुग्णालयाची नोंदणी मुंबई महापालिकेने महिनाभरासाठी रद्द केली आहे. मुंबईत कोरोना काळातील ही पहिलीच कारवाई असल्याचे समजते. माहीममधील एम. म. चोटानी मार्गावरील या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असतानाही त्याच्यावर कोरोनाचे उपचार करण्यात येत होते. त्याला आवश्यक असलेले औषध आणण्यासाठी भलत्याच रुग्णाच्या नावाची चिठ्ठी देण्यात आल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला होता.

रुग्णाचा मृत्यू आणि कारणे दाखवा नोटिसीला उत्तर न दिल्यामुळे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट १९४९ अंतर्गत या रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द करण्याचे आदेश शनिवारी महापालिकेने दिले.

नव्या रुग्णांसाठी प्रवेश बंद
रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द करण्यात आल्यानंतर येथील रुग्णांची ४८ तासांत अन्यत्र व्यवस्था करावी किंवा त्यांना घरी पाठवावे तसेच नव्या रुग्णांना प्रवेश देऊ नये, असे आदेशही पालिकेने दिले आहेत.

अधिक पैसे घेतल्याची तक्रार : या रुग्णालयाने उपचारासाठी सरकारी दरापेक्षा अधिक पैसे घेतल्याची तक्रार कोरोनामुक्त झालेल्या काही जणांनी पालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे केली होती. आतापर्यंत येथे सुमारे एक ते दीड हजार कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यात पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

Web Title: The registration of the hospital at Mahim has been canceled by the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.