Join us

नोकरीसाठीची नोंदणी तरुणीला पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 6:05 AM

तक्रारदार २६ वर्षीय तरुणी शिवडीत राहते.

मुंबई : नोकरीसाठी नोंदणी करणे तरुणीला चांगलेच महागात पडले. तिची १५ हजार रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची घटना काळाचौकीमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार २६ वर्षीय तरुणी शिवडीत राहते. बुधवारी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलधारकाने ‘शाईन डॉट कॉम’मधून बोलत असल्याचे सांगून बँकेमध्ये बॅक आॅफिस व कॅशियरसाठी नोकरी असल्याचे सांगितले. त्यासाठी पाठविलेल्या लिंकवरून १० रुपये भरून नोंदणी करण्यास सांगितले. त्यानुसार, तिने संकेतस्थळावरून पैसे भरले. यात तिला आलेले ओटीपी क्रमांक तिने संबंधिताला सांगितले. त्यानंतर तिच्या खात्यातून १५ हजार ७९७ रुपये काढण्यात आल्याचा मेसेज तिला मोबाइलवर आला. फसवणूक झाल्याचे समजताच तिने काळाचौकी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

टॅग्स :गुन्हेगारीनोकरी