MahaRERA: नोंदणी क्रमांक टाकला नाही, १२ बिल्डरांना महारेराचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 02:56 PM2023-04-21T14:56:42+5:302023-04-21T14:57:06+5:30

MahaRERA: महारेरा क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या १२ बिल्डरांना महारेराने सुनावणी घेऊन १०, २५, ५० हजार आणि दीड लाख असा एकूण ५.८५ लाखांचा दंड ठोठावला आहे.

Registration number not entered, 12 builders fined MahaRERA | MahaRERA: नोंदणी क्रमांक टाकला नाही, १२ बिल्डरांना महारेराचा दंड

MahaRERA: नोंदणी क्रमांक टाकला नाही, १२ बिल्डरांना महारेराचा दंड

googlenewsNext

मुंबई - महारेरा क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या १२ बिल्डरांना महारेराने सुनावणी घेऊन १०, २५, ५० हजार आणि दीड लाख असा एकूण ५.८५ लाखांचा दंड ठोठावला आहे. यात नाशिकमधील ५, छत्रपती संभाजीनगरातील ४, पुण्यातील २ आणि मुंबईच्या एका बिल्डरांचा समावेश आहे.

५०० स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त किंवा ८ सदनिकांचा कुठलाही प्रकल्प असल्यास महारेराकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. महारेरा नोंदणी क्रमांक असल्याशिवाय कुठल्याही बिल्डरला प्रकल्पाची जाहिरात, त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी, विक्री करता येत नाही. असे असले तरी काही बिल्डर या नियमाकडे कानाडोळा करून महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय जाहिराती छापत असल्याचे निदर्शनास आल्यावर महारेराने नोंद घेतली...

कारवाई काय ?
■ पहिल्या टप्प्यात १५ प्रकल्पांची सुनावणी घेऊन १२ प्रकल्पांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातील ११ बिल्डरकडे महारेरा नोंदणी क्रमांक असूनही त्यांनी जाहिरातीत छापला नाही म्हणून हे दंड ठोठावण्यात आले.

यात एका बिल्डरला दीड लाख, ७ त्याची बिल्डरला प्रत्येकी ५० हजार आणि ३ बिल्डरला प्रत्येकी २५ हजार दंड ठोठावण्यात आला आहे. एका बिल्डरने आपला नोंदणी क्रमांक अतिशय बारीक अक्षरात छापला म्हणून त्यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

■ आता दंडाची रक्कम १५ दिवसांत भरायची असून जे भरणार नाहीत, त्यांना विलंबासाठी दरदिवशी १ हजार रुपये जादा भरावे लागणार आहेत. शिवाय १५ दिवसांनंतर त्यांना दंड भरेपर्यंत महारेराच्या सेवांचा लाभ घेता येणार नाही.

Web Title: Registration number not entered, 12 builders fined MahaRERA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.