Join us

नीट-यूजी आणि एमएचटी-सीईटीच्या नोंदणीला १६ मार्चपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 7:56 AM

राज्यस्तरीय एमएचटी-सीईटीकरिताही १५ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांकरिता देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या नीट-यूजीच्या नोंदणीला १६ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तसेच महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय एमएचटी-सीईटीकरिताही १५ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

आधार कार्ड नोंदणीत अडचणी येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अजूनही नीट-यूजीचे अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे नोंदणीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्याला प्रतिसाद देत ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने नीट-यूजीकरिता १६ मार्चपर्यंत नोंदणी करण्यास मुभा दिली आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, फार्मसीसह बी-प्लानिंग व कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता १६ ते ३० एप्रिलदरम्यान होणाऱ्या एमएचटी-सीईटी या राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेच्या नोंदणीकरिताही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने १६ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रवेश परीक्षेकरिता अर्ज करण्याची ८ मार्च ही अंतिम मुदत होती. ती आता १५ मार्च असेल, तर ऑनलाइन पद्धतीने १६ मार्चपर्यंत शुल्क भरता येईल, असे सीईटी सेलने कळविले आहे. 

टॅग्स :नीट परीक्षेचा निकाल