एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडत असलेल्या महिलेसोबत अश्लिल वर्तन झाल्याची बातमी चुकीची

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 09:20 AM2017-10-02T09:20:16+5:302017-10-04T15:03:43+5:30

परळ-एलफिन्स्टन पूलावर चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर मदतीच्या नावाखाली तरुणीसोबत अश्लिल वर्तन करण्यात आल्याची बातमी चुकीची असल्याची माहिती समोर आली आहे.

Regrettably! The behavior of the young man with the woman who died in Elphinston stampede | एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडत असलेल्या महिलेसोबत अश्लिल वर्तन झाल्याची बातमी चुकीची

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडत असलेल्या महिलेसोबत अश्लिल वर्तन झाल्याची बातमी चुकीची

Next

मुंबई -  परळ-एलफिन्स्टन पूलावर चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर  त्याठिकाणी काही लोकांनी मदतीच्या नावाखाली लज्जास्पद कृत्य केल्याचं वृत्त आलं होतं. द हिंदू वृत्तपत्राने यासंबंधी वृत्त देत तरुणाने महिला मृत्यूमुखी पडत असताना अश्लिल चाळे केल्याची बातमी दिली होती. मात्र भोईवाडा पोलिसांना असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान द हिंदू वृत्तपत्रानेही चुकीची बातमी दिली असल्याचं सांगत माफी मागितली आहे. वृत्तपत्राने ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी काढून टाकत असल्याचं सांगितलं आहे. 

शुक्रवारी एलफिन्स्टन - परळ रेल्वे स्थानकावरील फुटओव्हर ब्रिजवर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला असून, 35 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 



दुर्घटनेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. मृत महिलांच्या अंगावरील दागिने लुटून नेण्यात आल्याचं समोर आलं आहे. मदत करण्याच्या बहाण्याने मृत महिलांच्या पर्स आणि दागिने लंपास करण्यात आले. पोलीस याप्रकरणी तपास करत असून सीसीटीव्हींसोबत सर्व व्हिडीओंची तपासणी केली जात आहे. 


एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कांजुरमार्गच्या रहिवासी सुभलता शेट्टी यांच्या मृतदेहावरुन सोन्याचे दागिने चोरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुभलता शेट्टी यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या नसल्याचं लक्षात आलं. सोशल मीडियात फिरणाऱ्या एका छायाचित्रात एक जण सुमलता यांच्या हातातील बांगड्या काढून घेताना दिसल्याचं ट्विट सुभलता यांचे शेजारी गणेश शेट्टी यांनी केलं आहे. शेट्टी यांनी हा फोटो रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसळगीकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना ट्विट केला. या ट्विटची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने पश्चिम रेल्वे आरपीएफला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

'पोलिसांकडून आम्हाला फक्त मोबाईल मिळाला. फोटोत त्यांच्या हातात दिसणाऱ्या बांगड्या मिळाल्या नाहीत,” अशी माहिती शुभलता यांचे शेजारी गणेश शेट्टी यांनी दिली. एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला तर 39 प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये शुभलता यांच्यासह त्यांच्या मैत्रिणीचाही समावेश आहे.

एलफिन्स्टन- परेल पुलावर शुक्रवारी सकाळी नेमकं काय घडलं?

- सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.
- त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.
- त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.
- त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.
- गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली.
- ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले
- एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली
- सकाळी 9.30 च्या सुमारास थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.
- जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- काही मिनिटांतच मृतांचा आकडा वाढत गेला

Web Title: Regrettably! The behavior of the young man with the woman who died in Elphinston stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.