मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या तक्रार निवारणविषयक संकेत स्थळांवर महापालिकेशी संबंधित ज्या तक्रारी नोंदविल्या जातात, त्या तक्रारींचा व तक्रार निवारणाचा नियमितपणे आढावा घ्यावा, असे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापालिकेच्या सर्व उपायुक्तांना, सहायक आयुक्तांना व विभाग प्रमुखांना दिले आहेत.केंद्र शासनाच्या ‘केंद्रीय तक्रार निवारण आणि संनियंत्रण यंत्रणे’च्या संकेतस्थळावर आणि राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळांवर नागरी सेवा सुविधाविषयक तक्रारी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळांवर महापालिकेशी संबंधित ज्या तक्रारी नोंदविल्या जातात, त्या महापालिकेकडे आॅनलाइन पद्धतीने पाठविल्या जातात. त्यानुसार, महापालिकेकडे आलेल्या तक्रारी कशा प्रकारे बघाव्यात, त्याबद्दल तक्रार निवारण करताना काय काळजी घ्यावी? तसेच तक्रारीचे निवारण झाल्यानंतर संबंधित संकेतस्थळावर त्याविषयची माहिती कशी अद्ययावात (अपलोड) करावी, याबाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती व्हावी, या दृष्टीने आयोजित बैठकीत आयुक्त बोलत होते.आयुक्तांनी तक्रारींचा व तक्रार निवारणाचा नियमितपणे आढावा घेण्याबाबत, समन्वयनात्मक कार्यवाही करण्याची जबाबदारी महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)काम पूर्ण कराच्वर्दळीच्या रस्त्यांवर अधिक खड्डे आहेत, त्या रस्त्यांबाबत केवळ खड्डे भरण्याची कार्यवाही न करता, त्या रस्त्याचा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा भाग हा पूर्णपणे नव्याने करण्याचे काम हाती घ्यावे, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.च्पावसाळापूर्व कामांचाही आढावा आयुक्तांनी घेतला. यामध्ये प्रामुख्याने पाणी साचण्याची ठिकाणे, त्याबाबत केलेली कार्यवाही आणि नाल्यांवरील अतिक्रमणांविषयीच्या कार्यवाहीचा समावेश होता.
‘तक्रार निवारणाचा नियमितपणे आढावा घ्या’
By admin | Published: January 09, 2017 5:01 AM