वैभव गायकर ल्ल पनवेलप्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला वाघिवली गावाची गरज नसल्याचे कारण पुढे करीत सिडकोने हे गाव विमानतळबाधित प्रक्रि येतून वगळले आहे. प्रकल्प आराखड्यात गावाचा समावेश आहेच, शिवाय ८० टक्के खातेदारांकडून संमतीपत्र घेऊनही सिडकोने नकार दिल्याने या परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. इतर बाधितांप्रमाणे आमचेही पुनर्वसन करा, अशी मागणी वाघिवलीच्या ग्रामस्थांनी केली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता २०५५ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून त्यापैकी १४४० हेक्टर जमीन खाजगी मालकीची आहे. ६१५ हेक्टर जमीन शासकीय आहे. एकूण क्षेत्रापैकी ९८२ हेक्टर खाजगी जमीन यापूर्वीच सिडकोने संपादित केली असून उर्वरित ६७१ क्षेत्र संपादण्याची प्रक्रि या सुरू आहे. चिंचपाडा, कोल्ही, कोपर, वाघिवली, वरचे ओवळे, वाघिवली वाडा, गणेशपुरी, कोंबडभुजे, उलवे या गावांचा आराखड्यात समावेश आहे, त्यामध्ये ३५०० घरमालक आहेत. गेल्यावर्षी राज्य शासनाने संबंधित प्रकल्पबाधितांना विशेष पॅकेज जाहीर केले. या प्रकल्पाने विस्थापित होणाऱ्यांना घरांच्या तिप्पट जागा देण्याची घोषणा केली, त्यानुसार पुनर्वसनाची प्रक्रि या युद्धपातळीवर सुरू असून बाधितांना जागा देण्याकरिता सोडतही काढल्या आहेत, मात्र त्यातून सिडकोने खाडीतील वाघिवली गावाला बाजूला केले आहे. पूर्वी विमानतळाला बहुतांशी गावांनी विरोध केला, मात्र वाघिवलीकरांनी या प्रकल्पाचे सातत्याने समर्थन केले. इतकेच काय तर २०१० साली या ठिकाणाहूनच तत्कालीन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गिल यांनी पुनर्वसनाबाबत सिडकोची भूमिका विशद केली. माजी सरपंच सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाघिवलीकरांनी सिडकोला सहकार्य करूनही प्राधिकरणाने अन्याय केल्याची नागरिकांची भूमिका आहे.गावात एकूण १८७ घरे असून त्यापैकी ११२ जणांची संमतीपत्रके भरून घेण्यात आली आहेत. उर्वरित खातेदारांची संमतीपत्रके भरून घेण्यात आली नाहीत. आम्ही सिडकोकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करीत असताना त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळत नाही. भरावामुळे वस्तीत घुसते भरतीचे पाणीच्वाघिवली गाव हे इंग्रजांच्या काळापासूनचे बेट आहे. याठिकाणी ये-जा करण्यासाठी पाण्यात पोहत पलीकडच्या गावाला जावे लागत असे. म्हणजे या ठिकाणी सुविधांचा अभाव होता आणि आजही आहे. सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे पाण्याचा. त्यातच वडघर या ठिकाणी झालेल्या भरावामुळे गावात भरतीचे पाणी शिरते. जिकडे तिकडे पाणीच पाणी होत असल्याने वाघिवलीकर त्रस्त आहेत. च्जर गावाचे स्थलांतर केले नाही तर विमानतळाच्या प्रस्तावित पाच हजार एकरावरील भरावामुळे हे गाव पूर्णत: पाण्यात जाईल आणि मग आमचे भय कधीच संपणार नाही, अशी प्रतिक्रि या संदीप मुंडकर यांनी दिली. रविवारी दुपारी भरतीच्या वेळी खाडीचं पाणी गावात शिरल्याने ग्रामस्थांच्या भीतीत आणखीनच वाढ झाली आहे.वाघिवली विमानतळामुळे बाधित होणार नाही. त्यामुळे या गावातील गावठाण संपादित करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर ज्या गावाच्या जमिनीवर विमानतळ होणार आहे त्यांनाच जागा देण्यात येणार आहे. वाघिवलीच्या घरांना एकच पट जागा देता येणार असल्याने त्यांनी विरोध दर्शवला आहे. - रेवती गायकर ,भूसंपादन अधिकारी, मेंट्रो सेंटर प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी काही ठिकाणी भरावही टाकण्यात आला आहे. त्याचा फटका म्हणून वाघिवली गावात भरतीचे पाणी घुसू लागले आहे. रविवारीही भरतीच्या पाण्याने असा गावात शिरकाव केला.
आमचेही आता पुनर्वसन करा!
By admin | Published: March 22, 2015 10:30 PM