मार्गिकेंतर्गत येणाऱ्या वसाहतींचे पुनर्वसन; चकाला येथे पर्यायी घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 06:09 AM2018-09-05T06:09:07+5:302018-09-05T06:09:19+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील मेट्रो ३च्या भुयारी मार्गिकेचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या मार्गिकेंतर्गत येणाºया वसाहतींचे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनद्वारे पुनर्वसन करण्यात येत आहे. मरोळ नाका, अंधेरी एमआयडीसी आणि सीप्झ या मेट्रो स्थानकांसाठी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येत आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील मेट्रो ३च्या भुयारी मार्गिकेचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या मार्गिकेंतर्गत येणाºया वसाहतींचे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनद्वारे पुनर्वसन करण्यात येत आहे. मरोळ नाका, अंधेरी एमआयडीसी आणि सीप्झ या मेट्रो स्थानकांसाठी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. एमएमआरसीएलने लॉटरीद्वारे या झोपडपट्टीतील रहिवाशांना अंधेरीतील चकाला परिसरात घरे उपलब्ध करून दिली आहेत.
एमएमआरसीएलच्या आवारात नुकत्याच संपन्न झालेल्या लॉटरी समारंभात अंधेरी पूर्व एमआयडीसी विभागातील झोपडपट्ट्यांमधील एकूण ३० कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच या विभागातील २ दुकानांनाही पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक लॉटरीद्वारे पूर्ण करण्यात आली असून, काही मिनिटांतच या रहिवाशांना त्यांचे नवे घर नेमके कोणते आहे हे समजले. ३२पैकी ३० कुटुंबांचे चकाला - मूळगाव अंधेरी इमारत क्रमांक ३ ‘डी’ विंग येथे पुनर्वसन झाले असून, २ दुकानधारकांचे कांजूरमार्ग येथील हरियाली व्हिलेज येथील इमारत क्रमांक ३ येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. हे घर वन बीएचके असून, त्याचे एकूण क्षेत्रफळ २६९ चौरस फूट इतके आहे.
वरिष्ठ नागरिकांना पहिल्या मजल्यावर घर
- पुनर्वसन होणाºया या झोपडपट्टीतील काही वरिष्ठ नागरिक शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. त्यांनी वृद्धापकाळामुळे आपल्याला शारीरिक हालचाल करणे शक्य होणार नसल्याच्या कारणाने पहिल्या मजल्यावर घर मिळावे, असे विनंती पत्र एमएमआरसीएलला लिहिले होते. त्यांच्या विनंतीचा मान राखून त्यांना पहिल्या मजल्यावर घर मिळवून देण्यात आले आहे.